Join us  

रिया शर्माने मैत्रिणीला दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 2:32 PM

आपल्या ताज्या आणि पुरोगामी कथानकामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे

आपल्या ताज्या आणि पुरोगामी कथानकामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. या मालिकेत नायिका मिष्टीची भूमिका अभिनेत्री रिया शर्मा साकारीत असून यात ती आजवर कधी न पाहिलेल्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे.

मालिकेतील मिष्टी या व्यक्तिरेखेप्रमाणेच प्रत्यक्ष जीवनातही रियाला तिचे मित्र-मैत्रिणी अनेक बाबतीत सल्ले विचारतात. अशाच एका बाबतीत रियाने आपल्या एका मैत्रिणीच्या निर्णयाला पाठिंबा देत ती तिच्या पाठीशी उभी राहिली. या अभिनेत्रीशी निकटचे संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, रियाची मैत्रीण एका अवघड टप्प्यातून जात होती कारण तिचे लग्न ज्या मुलाशी ठरले होते, त्याला ती पूर्णपणे ओळखत नव्हती. त्यामुळे लग्नाची घाई न करता एकमेकांना अधिक जवळून जाणून घेण्यासाठी तिला वेळ हवा होता. तिच्या या मतांना रियाने पाठिंबा दिला आणि या निर्णयावर आपण तिच्यामागे ठामपणे उभ्या राहू असं तिला सांगितलं. तसंच तिने आपल्या या भावी जोडीदाराची माहिती करून घ्यावी आणि नंतर तिला पसंत पडल्यावरच तिने लग्नासारख्या गोष्टीला संमती द्यावी, असा सल्ला रियाने तिला दिला. समोरची व्यक्ती ही तुमची जीवनसाथी बनण्यास लायक आहे, याबद्दल तुमच्या मनाची खात्री पटली, तरच तुम्ही त्याच्याशी विवाहबध्द होणं चांगलं, असं मतही तिने मांडलं. यानंतर काही काळ रिया या मैत्रिणीबरोबरच राहात होती आणि तिला कोणताही निर्णय घेण्यात मदत करीत होती.”

आपल्या मैत्रिणीच्या विचारांना पाठिंबा देण्याचा रियाचा निर्णय निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. रिहाच्या व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनय कौशल्यामुळे तिला मिष्टीची भूमिका रंगविताना पाहणे नक्कीच रंजक ठरेल. १८ मार्चपासून पाहा ‘ये रिश्ते है प्यार के’ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्त ‘स्टार प्लस’वर पाहता येणार आहे. 

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैस्टार प्लस