छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक काळानंतर या मालिका रसिकांचा निरोप घेतात. मालिका बंद झाल्या असल्या तरी अगदी मोजक्याच मालिका रसिकांच्या कायम लक्षात राहतात. अशीच एक मालिका म्हणजे छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरलेली 'आभाळमाया'.
आभाळमाया मालिकेलाही आता २० वर्षाहूनही अधिक काळ लोटला असला तरी. आजही मालिकेच्या आठवणी रसिकांच्या मनात घर करुन आहेत.मालिकेत सुकन्या मोने यांनी सुधाची भूमिका साकारली होती तर मनोज जोशी यांनी शरद ची भूमिका साकारली होती.सुधा आणि शरद यांना आकांक्षा आणि अनुष्का या दोन मुली दाखवण्यात आल्या होत्या. आकांक्षाची भूमिका अभिनेत्री परी तेलंगने साकारली होती तर अनुष्काची भूमिका ऋचा पाटकर हिने साकारली होती. मालिकेतील काही कलाकार आजही वेगवेगळ्या मालिका सिनमाच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करत आहेत.
.पण अनुष्का भूमिका साकारलेली ऋचा पाटकर मात्र या मालिकेनंतर कुठेच झळकली नाही. याच मालिकेमुळे ऋचाला नवी ओळख आणि लोकप्रियता लाभली होती. आता ऋचा कशी दिसते काय करते असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. ऑनस्क्रीन लूकप्रमाणे खऱ्या आयुष्यातही ती खूप सुंदर दिसते.
मुंबईतच लहानाची मोठी झालेल्या ऋचाने केसी कॉलेजमधून तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. २०१३ साली आदित्य नागवेकरसह लग्न करुन संसारात रमली. ऋचाला अभिनयापेक्षा डान्सची आवड आहे. तसेच तिला वेगवेगळ्या ठिकाणांनाही भेटी द्यायला आवडते. तिथली संस्कृती जाणून घेण्यात तिला प्रचंड रस आहे. तसेच वेगवेगळे पदार्थ बनवण्याची तिाल खास आवड आहे. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे पदार्थ बनवत त्यांचे फोटोही ती शेअर करताना दिसते.