Join us  

‘अ‍ॅक्शन का स्कूल टाइम...’मधला हा चिमुकला सध्या काय करतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 12:55 PM

छोट्या पडद्यावरच्या काही मालिका जशा कायम लक्षात राहतात, तशाच काही जाहिरातीही कायम स्मरणात राहतात. अशीच एक जाहिरात म्हणजे, ‘अ‍ॅक्शन स्कूल शूज’ची. ही जाहिरात अनेकांना आजही आठवत असेल.

ठळक मुद्देमनोरंजन विश्वाला कायमचा रामराम ठोकत तेजन अभ्यासात रमला आणि पुढे शिकून डॉक्टर झाला.

छोट्या पडद्यावरच्या काही मालिका जशा कायम लक्षात राहतात, तशाच काही जाहिरातीही कायम स्मरणात राहतात. अशीच एक जाहिरात म्हणजे, ‘अ‍ॅक्शन स्कूल शूज’ची. ही जाहिरात अनेकांना आजही आठवत असेल.ओ हो हो स्कूल टाइमअ‍ॅक्शन का स्कूल टाइम प्रेयर्ज होती एव्हरी मॉर्निंगस्टाईल से होती सबकी चेकिंगक्लासवर्क, होमवर्क, पनिशमेंट लेक्चर..गुड... गुड मॉर्निंग टीचरफायटिंग, फ्रेण्डशीप, मस्ती, पीटीबजी बेल और हो गयी छुट्टीओ हो हो स्कूल टाइमअ‍ॅक्शन का स्कूल टाइम...

हीच ती जाहिरात. नव्वदीच्या दशकातील ही जाहिरात आणि त्याचे जिंगल आठवण्याचे कारण म्हणजे, या जाहिरातील एक क्यूट चेह-याचा चिमुकला.

कुरळे केस, बोलके डोळे असलेल्या या जाहिरातील चिमुकल्याचा चेहरा आजही डोळ्यांपुढे येतो. त्याचे नाव आहे तेजन दिवानजी. ‘अ‍ॅक्शन शूज’सोबत्  मॅगी, बँड-एडसारख्या अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये तो झळकला होता. ‘पहला नशा’ या गाण्याच्या रिमिक्समध्येही तो दिसला होता. हा चिमुकला आज कसा दिसतो? काय करतो? असा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांना पडला असेल. तर चला, आज जाणून घेऊयात हा चिमुरडा सध्या काय करतो, कसा दिसतो ते.

अनेक जाहिरातीत झळकणा-या या चिमुरड्याला आज बघाल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. होय, कारण इतक्या वर्षांत तो इतका बदलला आहे की, हाच तो यावर विश्वास ठेवणे कठीण होईल. तेजन आता डॉक्टर आहे. मनोरंजन विश्वाला कायमचा रामराम ठोकत तेजन अभ्यासात रमला आणि पुढे शिकून डॉक्टर झाला.

 2008 साली अमेरिकेतील नॉर्थ कॅरेलोना विद्यापीठातून त्याने बायो मेडिकल इंजिनिअररिंगमध्ये पदवी घेतली. त्यानंतर डॉक्टर ऑफ  मेडिसीनची पदवी घेतली. 2013 मध्ये त्याने मेरीलँड स्कूल ऑफ  मेडिसीनमध्ये औषधांसदर्भातील पदवी मिळवली. त्यानंतर मेरीलँडमधल बाल्टीमोर येथील मेडस्टर युनियन ममोरियल रूग्णालयात एक वर्ष इंटर्नशिप केली. गतवर्षी त्याची इंटर्नशिप पूर्ण झाली आणि 2018 च्या अखेरिस मियामी विद्यापीठात तो प्राध्यापक म्हणून रूजू झाला. सध्या तो सिल्वेस्टर कॉम्प्रीहेन्सीव कॅन्सर सेंटरमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो. कॅन्सरवर उपचार करताना वापरण्यात येणा-या रेडिएशन उपचारांचा तो तज्ज्ञ आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजन