Join us

'नकळत सारे घडले' ही मालिका या हिंदी मालिकेचा रिमेक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 13:45 IST

जुन्या जमान्यातल्या सुपरहिट ठरलेल्या सिनेमांचा रिमेक करणं हा बॉलिवूडमध्ये काही नवा ट्रेंड नाही...आता यांत आणखी एका माध्यमाची  भर पडतेय ...

जुन्या जमान्यातल्या सुपरहिट ठरलेल्या सिनेमांचा रिमेक करणं हा बॉलिवूडमध्ये काही नवा ट्रेंड नाही...आता यांत आणखी एका माध्यमाची  भर पडतेय ती म्हणजे टीव्ही मालिकांची.सध्या जुन्या मालिकांचा दुसरा सिझन म्हणून सिक्वेलही सुरू झाले आहेत.त्यात अशा अनेक मालिकांचा समावेश आहे ज्या आता सिझन 2 म्हणून रसिकांच्या भेटीला येत आहेत.यांत आता रिमेक हा ट्रेंडही मालिकांमध्ये सुरू झाल्याचा पाहायला मिळतंय.नुकतंच 'नकळत सारे घडले' ही एक नवी मालिका सुरु होणार आहे.या मालिकेचे प्रोमोही सध्या टीव्हीवर झळकत आहे. प्रोमो पाहताच ही मालिका हिंदी मालिका 'ये है मौहब्बते' या मालिकेचा रिमेक असल्याचे जाणवते.कारण 'ये है मोहब्बते' मालिकेच्या कथेसारखीच कथा 'नकळत सारे घडले' मालिकेच्या त्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते.त्यामुळे दोन वेगवेगळ्या भाषा असूनही त्यातील काही गोष्टी सारख्याच असल्याचं वाटतं. 'नकळत सारे घडले'मालिकेच्या प्रोमोत दोन्ही मालिकांच्या कथेचा मूळ गाभा जवळपास सारखाच असल्याचे चटकन लक्षात येत.त्यामुळे नक्कीच हिंदीत सुरू असलेली 'ये है मोहब्बते' ही मालिका आता मराठीत 'नकळत सारे घडले' माध्यमातून पाहायला मिळणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.एखाद्या हिंदी मालिकेचा मराठीत रिमेक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशा मालिका रिमेकच्या स्वरूपात आल्या होत्या. छोट्या पडद्यावर गाजलेल्या दोन मालिका एक 'काहे दिया परदेस' ही मराठी मालिका तर दुसरी 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' ही हिंदी मालिका एकाचवेळी दोन वेगवेगळ्या चॅनलवर सुरू होत्या. दोन्ही मालिकांचा जवळपास सगळ्याच गोष्टी सारख्याच होत्या.मुळात दोन्ही मालिकांच्या कथेचा मूळ गाभा हा लव्ह स्टोरी हाच होता.'काहे दिया परदेस' या मालिकेत गौरी आणि शिव या दोघांची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली. तर दुसरीकडे 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेत देव आणि सोनाक्षीची लव्हस्टोरी बहरत चालली होती.दोन्ही मालिकेतील कपलच्या लव्ह स्टोरीची सुरुवात थोडी भांडणं, थोडं रुसवा, थोडा फुगवा यापासून  झाल्याचे पाहायला मिळाले.या दोन्ही मालिकेत आणखी एक मुख्य समानता म्हणजे यामध्ये घडणारं भिन्न संस्कृतीचं दर्शन.'काहे दिया परदेस' या मालिकेत शिव हा उत्तर भारतीय तर गौरीचं कुटुंब मराठमोळं दाखवण्यात आलं होतं. तर 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेतील सोनाक्षीचं कुटुंब बंगाली दाखवण्यात आलं होतं.तर देवचं कुटुंब पारंपरिक हिंदी भाषिक होतं.त्यामुळे आजवर या आणि अशा कितीतरी गोष्टी तुम्हालाही या दोन्ही मालिकेत सारख्या वाटल्या असतील.येत्या काळातही दोन्ही 'नकळत सारे घडले' आणि 'ये है मोहबत्ते' मालिकांच्या कथेचा प्लॉट सारखाच भासल्यास आश्चर्य वाटायला नको.