Join us

ओळखा पाहू हे कोण आहेत हे मराठीतील सुपरहिट जोडपे जे लवकरच होणार विभक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 15:26 IST

छोट्या पडद्यावर घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार आहे. किरण करमरकर आणि रिंकू करमरकर ...

छोट्या पडद्यावर घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार आहे. किरण करमरकर आणि रिंकू करमरकर यांच्या लग्नाला जवळजवळ १५ वर्षं झाली आहे. यांची जोडी किरण आणि रिंकूच्या फॅन्सना खूपच आवडते. किरण आणि रिंकू अनेक वेळा कार्यक्रमात, पार्टीत एकत्र पाहायला मिळतात. पण त्यांच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. किरण आणि रिंकूने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.किरण करमरकरने कहानी घर घर की या मालिकेत ओम ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्याच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. ही मालिका त्या काळात चांगलीच गाजली होती. एवढेच नव्हे तर या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. या मालिकेत रिंकूने छाया ही भूमिका साकारली होती. या मालिकेत रिंकू आणि किरण आपल्याला भावा-बहिणींच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. याच मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. या मालिकेच्या काहीच वर्षांनंतर त्या दोघांनी लग्न केले. रिंकू आणि किरणच्या नात्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून दुरावा आला असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर ते दोघे वर्षभरापासून वेगळे राहात असल्याचे म्हटले जात आहे. बॉम्बे टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ते दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. त्यांनी त्यांच्या बातमीत म्हटले आहे की, रिंकू आणि किरण हे दोघेही मॅच्युअर्ड आहेत. त्यांच्यात काही वाद असल्याने त्यांनी आता सामंजस्याने वेगळे व्हायचे ठरवले आहे. त्या दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.रिंकू आणि किरण यांना एक मुलगा आहे. त्यामुळे त्या दोघांसाठी त्यांचा मुलगा हीच प्रायोरिटी असणार आहे. त्यांच्या खाजगी आयुष्यात कोणीही हस्तक्षेप केलेला त्यांना आवडत नसल्याने त्यांनी यावर मौन राखणेच पसंत केले आहे. किरणला आपल्याला नुकतेच ढाई किलो प्रेम या मालिकेत पाहायला मिळाले होते तर यह वादा रहा या मालिकेत रिंकू काम करत होती. पण काहीच महिन्यांपूर्वी तिने ही मालिका सोडली असून या मालिकेतील तिची भूमिका तिचीच बहीण अशित धवन साकारत आहे. Also Read : छोट्या पडद्यावर आता अभिनयाला नव्हे तर दिसण्याला महत्त्वः किरण करमरकर