Join us

बॉलिवूडमध्ये बँकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती सुरुवात, आज आहे मराठीतला लोकप्रिय अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 09:00 IST

अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ ह्या सिनेमाच्या गाण्यात ब्रॅकग्राऊंड डान्सर म्हणून त्याने काम केले आहे. कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याकडून त्याने रितसर ट्रेनिंग देखील घेतले आहे.

महाराष्ट्राच्या मातीत कसून तयार झालेला रांगडा मर्द हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झाला. याच मालिकेने त्याला वेगळी ओळख निर्माण करुन दिली होती. अल्पावधीतच अभिनेता हार्दीक जोशीच्या राणादा या व्यक्तिरेखेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं.राणामुळे हार्दिकला रसिकांचे भरभरुन प्रेम मिळाले.मालिका संपल्यावर राणाला चाहते खूप मिस करत होते. 

अखेर हार्दिक जोशी “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” या मालिकेतून पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आला. अल्पावधीतच ही मालिकाही रसिकांची आवडती मालिका बनली आहे. हार्दिक जोशीच्या नवीन भूमिकेलाही रसिकांची चांगलीच पसंती मिळत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? अभिनयातच नाहीतर उत्तम डान्सरही आहे.मुळात हार्दिक जोशी हा मालिकेत एंट्री करण्यापूर्वी बॉलिवडूमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायचा. 

अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ ह्या सिनेमाच्या गाण्यात हार्दिक जोशीने ब्रॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याकडून त्याने रितसर ट्रेनिंग देखील घेतले आहे. इतरांप्रमाणे हार्दिकला देखील संघर्ष काही चुकला नाही. त्यालाही उत्तम काम मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावे लागले आहे.हिंदी सिनेमा आणि मालिकांमध्ये चांगल्या संधीच्या तो शोधात होता. खूप प्रयत्न केले तरी त्याला यश काही मिळत नव्हते. मनासारख्या भूमिका मिळत नसल्यामुळे हार्दिक मराठी मालिकांकडे वळला. त्यानंतर त्याला छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या. मात्र त्याला खरी लोकप्रियता, पैसा प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा ही केवळ 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळेच मिळाली आहेत.

हार्दिक देखील फिटनेस फ्रिक अभिनेता आहे. कधीच वर्कआऊट आणि डाएटकडे तो दुर्लक्ष करत नाही. नित्यनियमाने तो वर्कआऊट करतो. त्याने वर्कआऊटच्या काही सवयी स्वतःला लावून घेतल्या आहे. त्यांचे तो नित्यनियमाने आणि काटेकोरपणे पालन करतो. त्याची फिटनेसबाबत असलेली ही सजगता आणि नियमित वर्कआऊट करणे यामुळे हार्दिक फिट आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. त्यामुळेच की फिटनेसबाबत तो आज लाखो तरुणांचा आदर्श आहे.  

टॅग्स :अजय देवगणहार्दिक जोशी