या कारणामुळे सुनिधी चौहान आणि नीना गुप्ता भडकली कपिल शर्मावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 11:19 IST
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या मागे लागलेली साडेसाती संपायला तयार नाहीये असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. गेल्या ...
या कारणामुळे सुनिधी चौहान आणि नीना गुप्ता भडकली कपिल शर्मावर
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या मागे लागलेली साडेसाती संपायला तयार नाहीये असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी सिडनीवरून परतताना कपिल शर्माने नशेच्या भरात सुनील ग्रोव्हर, अली असगर आणि चंदन प्रभाकर यांना शिव्या दिल्या होत्या. सुनीलला तर त्याने चप्पलेने चोपले होते. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून सुनील, अली आणि चंदन चित्रीकरण करत नाहीयेत. या तिघांची कार्यक्रमात चांगलीच कमतरता भासत आहे. या कार्यक्रमाचा टिआरपी ढासळत चालला आहे. टिआरपी परत मिळवण्यासाठी कपिलने उपासना सिंग आणि सुमोना चक्रवर्ती यांना कार्यक्रमात पुन्हा बोलावले आहे. पण त्याचा काहीही परिणाम मालिकेच्या टीआरपीवर होत नाहीये आणि आता गायिका सुनिधी चौहान, अभिनेत्री नीना गुप्ता कपिल शर्मावर प्रचंड भडकल्या आहेत. सुनिधी चौहानला द कपिल शर्मा शोमध्ये येण्यासाठी विचारण्यात आले होते आणि त्यासाठी तिने होकारदेखील दिला होता. पण तिला फोन करून सांगण्यात आले की, चित्रीकरण हे मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील. पण सुनिधीने आधीच काही कमिटमेंट्स दिल्या असल्याने तिला रात्री चित्रीकरण करायला जमणार नसल्याचे तिने सांगितले. यावर नवज्योत सिंग सिद्धू यांना दिल्लीहून यायला 11.30 तरी होतील आणि चित्रीकरण संपायला दोन तरी वाजतील असे सांगण्यात आले. त्यामुळे सुनिधीने चित्रीकरण करण्यासच नकार दिला. त्यानंतर तिला अनेक फोन टीमकडून करण्यात आले. पण तरीही ती तिच्या मतावर ठाम राहिली. केवळ सुनिधीचेच नाही तर नीना गुप्ता आणि तिची मुलगी मसाबा यांचे चित्रीकरणदेखील काही कारणास्तव अचानक रद्द झाले. नीना आणि मसाबा यांच्या चित्रीकरणाची तारीख ठरली होती. पण सिद्धू यांना वेळ नसल्याने चित्रीकरण अचानक रद्द करण्यात आले. पण मसाबाला रात्री तीन वाजता फोन करून कळवण्यात आले की, आपण उद्या चित्रीकरण करूया. त्यावर नीना आणि मसाबा या दोघांनीही नकार दिला. नीना यांना बरे नसल्यामुळे चित्रीकरण करणे त्यांना शक्य नव्हते. पण कपिलच्या टीमकडून सतत फोन येत असल्याने त्यांनी चित्रीकरणासाठी होकार दिला. पण काहीच मिनिटांनंतर चित्रीकरण रद्द झाल्याचा पुन्हा त्यांना फोन आला. पुढील काही दिवसांत चित्रीकरण केले जाईल असे त्यांना आता कळवण्यात आले आहे. द कपिल शर्मा शोच्या चित्रीकरणाला आता काहीच ताळतंत्र राहीलेला नाही हेच यातून आपल्याला दिसून येत आहे.