Join us  

या कारणामुळे गोव्यात असूनही भारतीच्या लग्नाला गेला नाही कपिल शर्मा,जाणून घेण्यासाठी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 9:36 AM

भारती सिंगचे लग्न होणार ही गोष्ट संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीसाठी खूप मोठी खुश खबर होती.3 डिसेंबरला कॉमेडीयन भारती सिंग हर्ष ...

भारती सिंगचे लग्न होणार ही गोष्ट संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीसाठी खूप मोठी खुश खबर होती.3 डिसेंबरला कॉमेडीयन भारती सिंग हर्ष लिंबाचियासह लग्नाच्या बेडीत अडकली.गोव्यात या दोघांचा पारंपारिक पद्धतीने विवाह पार पडला.भारती आणि हर्ष यांच्या लग्नाचे INSIDE PHOTO आता सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल होत आहेत.भारतीच्या गेस्ट लिस्टमध्ये शाहरुख खान, सलमान खान, करण जौहर, माधुरी दीक्षित, मलायका अरोरा यांसारख्या सेलिब्रिंटींची नावे होती.या सगळ्यांना भारतीने स्वत: जाऊन आमंत्रणं दिली होती.यापैकी कोणीही भारतीच्या लग्नात दिसले नाही.या लोकांनी भारतीच्या लग्नात हजेरी न लावणे हा एवढा मोठा मुद्दा नव्हता.अख्खी टीव्ही इंडस्ट्री या लग्नात उपस्थित होती. मात्र एक व्यक्ती होता जो या लग्नात दिसलाच नाही.तो म्हणजे कॉमेडी किंग कपिल शर्मा.विशेष म्हणजे भारतीच्या लग्नाच्या दिवशी कपिल शर्मा गोव्यातच होता.भारती आणि कपिल हे खूप चांगले मित्र आहेत.मग असे काय घडले की,कपिल शर्मा भारतीच्या लग्नात गेलाच नाही.कपिलचे लग्नात उपस्थिती नसणे या गोष्टीचे सा-यांनाचा आश्चर्य वाटत आहे.त्यामुळे सध्या या गोष्टीवरही खूप चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला कपिल भारतीच्या लग्नात का नव्हता याचे कारण सांगणार आहोत.कपिल ने भारतीच्या लग्नात न जाण्याचे कारण आहे कपिलचा 'यार' तो म्हणजे सुनील ग्रोव्हर.होय, कारण भारतीच्या लग्नात सुनील ग्रोव्हरही जाणार होता.सुनील ग्रोव्हर लग्नात येणार हे कळताच कपिलने लग्नात न जाण्याचा निर्णय घेतला.आणि सुनीलनेही कपिल या सोहळ्यात येणार असल्याचे कळताच गोव्या पोहचुन सुध्दा रिटर्न त्याच दिवशी मुंबईला रवाना झाला.Also Read:भारती सिंगच्या लग्नातील राखी सावंतचा डान्स तुम्ही पाहिला का?भारतीच्या लग्नात चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे राखी सावंत. राखी तसेही लाइमलाइटमध्ये राहाण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे भारती आणि हर्षच्या लग्नातदेखील तिची उपस्थिती विशेष लक्षवेदी ठरली. हर्ष आणि भारतीच्या लग्नाच्या प्रत्येक समारंभाला ती उपस्थित होती. लग्नात ती नृत्य करताना देखील दिसली. तिने तिच्या स्टाईलमध्ये भन्नाट डान्स सादर केला. या सगळ्या डान्समध्ये तिचा नागिन डान्स तर चांगलाच हिट झाला. राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्स करतानाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. राखीच्या या व्हिडिओला अनेक लाइक्स मिळाले असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. राखीने या व्हिडिओमध्ये घातलेल्या कपड्यांची देखील चर्चा होत आहे. तिने यात रंगीबेरंगी कपडे घातले आहेत. तसेच कलरफुल गॉगल देखील घातला आहे.