Join us

या कारणासाठी लिलिपूटची 'भाभीजी घर पर है'मध्ये झालीय एंट्री? जाणून घ्या काय कारण आहे ते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 16:53 IST

अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांना भरभरून हसवणारे अभिनेते लिलिपूट पुन्हा एकदा रसिकांचे भरघोस मनोरंज करण्यासाठी छोट्या ...

अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांना भरभरून हसवणारे अभिनेते लिलिपूट पुन्हा एकदा रसिकांचे भरघोस मनोरंज करण्यासाठी छोट्या पडद्यावर एंट्री करणार आहेत. 'भाभीजी घर पर है' या मालिकेत लिलिपूट झळकणार आहेत.विभूती नारायणच्या मामाची भूमिका लिलिपूट साकरताना दिसतील.विशेष म्हणजे मालिकेच्या पुढीला भागात ते मुन्नाभाई एबीबीएस या सिनेमाचे काही कॉमेडी सीन्सही आपल्या अंदाजात  सादर करताना दिसणार आहेत. सध्या सुरू असणारा मोडिफिकेशन ट्रॅक आता संपणार आहे त्यामुळे लिलिपूट यांच्या एंट्री मालिकेत नक्कीच नविन्य पाहायला मिळणार आहेत.लिलिपूट साकारत असलेले मामाजी अचानक विभूतूला भेटण्यासाठी येतात.त्यांच्या मते विभूती कानपुरमधील एक प्रसिध्दा डॅाक्टर आहे.मामाने विभूतीच्या शिक्षणासाठी बराच पैसा खर्च केला आहे.शिक्षण घेत असतांना विभूतीने आपल्या मामाला आपण मोठे होवून डॉक्टर बनणार असल्याचे वचन दिले होते.मात्र विभूतीने आपल्या मामाला दिलेले वचन पाळले नाही. डॉक्टर बनणे तर सोडा लांब लांब पर्यंत विभूतीचे डॉक्टरशी काही संबंध नसल्याचे आपल्या सा-यांनाच माहिती आहे.मात्र विभूती हा डॉक्टर नाहीय हे त्याच्या मामाला कळू नये यासाठी विभूतीचे मोहल्लेवाले एकत्र येतात विभूती डॉक्टर असल्याचे भासवतात. मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमाप्रमाणेच इथेही त्यांच्या घराला नर्सिंग होमचे रूप देण्याच येते. विभूतीचे हे कटू सत्य मामाला कळणार हे मात्र नक्की. या मालिकेविषय लिलिपूट सांगताता भाभीजी घर पर है मालिकेत माझ्या एंट्रीला घेवून मी उत्सुक आहे.या शोचा मी खरा फॅन आहे.त्यात मला आता मामाजीची भूमिका करायला मिळाली आहे त्यामुळे आनंदाची गोष्ट तर आहेच मात्र माझ्या खास शैलीत आता रसिकांचे मनोरंजन करण्याची संधी मिळते या गोष्टींचा मला सगळ्यात जास्त आनंद वाटत असल्याचे लिलिपूट यांनी सांगितले.