Join us

​या कारणामुळे बिपाशा बासूच्या वडिलांनी तिच्याशी धरला होता अबोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 14:08 IST

कलर्सवरील एन्टरटेनमेंट की रात @9 लिमिटेड एडिशन या शोला मागील काही आठवडे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या आठवड्यात प्रेक्षकांचे ...

कलर्सवरील एन्टरटेनमेंट की रात @9 लिमिटेड एडिशन या शोला मागील काही आठवडे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या आठवड्यात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध जोडी येणार आहे.बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या केमिस्ट्रीची चर्चा नेहमीच मीडियामध्ये होत असते. या दोघांची पहिली भेट अलोन या चित्रपटाच्या वेळी झाली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमाच पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एन्टरटेनमेंट की रात या कार्यक्रमात नुकतीच बिपाशा आणि करणने जोडीने हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या. या कार्यक्रमात त्या दोघांना तुमच्या आईवडिलांशी तुमचे संबंध कसे आहेत असे विचारले गेले होते. त्यावर बिपाशाचे उत्तर ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. या कार्यक्रमात बिपाशाने सांगितले की, “मला माझे पहिले मॉडेलिंगचे काम मिळाले तेव्हा मी केवळ १५ वर्षांचे होते. मी खूपच लहान असल्याने माझे पालक माझ्या या मॉडलिंगच्या कामासाठी तयार होणार नाहीत याची मला खात्री असल्याने मी माझ्या आईवडिलांना न सांगता काम करण्याचे ठरवले. ही गोष्ट मी त्यांच्यापासून अनेक महिने लपवली होती. पण मला या कामासाठी जेव्हा मुंबईवरून बोलावणे आले, तेव्हा मी त्यांना सगळे काही सांगितले. मी शाळेत असताना नेहमीच माझा पहिला क्रमांक यायचा आणि त्यामुळे मी डॉक्टर व्हावे अशी माझ्या आईवडिलांची इच्छा होती. त्यामुळे माझा हा निर्णय ऐकून माझे डॅड खूपच नाराज झाले होते. मी मॉडेलिंग मध्ये करियर करण्याचा निर्णय घेतल्यावर ते माझ्याशी एक वर्षं तरी बोलत नव्हते. पण मी माझा हा निर्णय योग्य असल्याचे मी सिद्ध करून दाखवले. त्यामुळे आता माझ्या आईवडिलांना माझा अभिमान वाटतो. माझा पहिला सिनेमा अजनबी पाहिल्यावर तर माझे पालक खूपच खूश झाले होते. त्यांनी मला सांगितले होते की, माझा अभिनय अतिशय नैसर्गिक आहे. माझे काम पाहून ते आश्चर्यचकित झाले होते.”Also Read : बिपाशा बासूने असा केला तिचा वाढदिवस सेलिब्रेट