Join us  

रात्रीस खेळ चाले 2 मधील शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरच्या खऱ्या कुटुंबाचे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 5:27 PM

रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत अण्णा नाईक ही भूमिका माधव अभ्यंकर साकारत आहेत तर शेवंताच्या भूमिकेत अपूर्वा नेमळेकर दिसत आहे.

ठळक मुद्देअपूर्वाने तिच्या कुटुंबाचे फोटो त्यात पोस्ट केले आहेत. हा फोटो तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे. या फोटोसोबत तिने पोस्ट लिहिली आहे की, ती पिझ्झा खाण्यासाठी डॉमिनोजमध्ये गेली असता तेथील स्टाफने खास तिची मालिका लावली होती

रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच रात्रीस खेळ चाले 2 प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला. या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडली आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील अण्णा आणि शेवंता हे तर प्रेक्षकांचे जीव की प्राण झाले आहेत. या मालिकेमुळे त्या दोघांनाही चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे.

रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत अण्णा नाईक ही भूमिका माधव अभ्यंकर साकारत आहेत तर शेवंताच्या भूमिकेत अपूर्वा नेमळेकर दिसत आहे. अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकली होती. 

शेवंताची अपूर्वाची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली आहे की, तिचे फॅन्स आता मोठ्या संख्येने सोशल मीडियावर तिला फॉलो करत आहेत. तिने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट केलेली एक पोस्ट तिच्या फॅन्सचे लक्ष वेधून घेत आहे. कारण अपूर्वाने तिच्या कुटुंबाचे फोटो त्यात पोस्ट केले आहेत. हा फोटो तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे. या फोटोसोबत तिने पोस्ट लिहिली आहे की, ती पिझ्झा खाण्यासाठी डॉमिनोजमध्ये गेली असता तेथील स्टाफने खास तिची मालिका लावली होती आणि या फोटोत आपल्याला तिच्यामागे असलेल्या टिव्हीत तिची मालिका देखील पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :रात्रीस खेळ चाले