Join us  

'रात्रीस खेळ चाले ३' फेम शेवंताने लग्नानंतर केला गृह प्रवेश, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 12:20 PM

Krutika Tulaskar : 'रात्रीस खेळ चाले ३' फेम शेवंता उर्फ कृतिका तुळसकरने १४ डिसेंबर रोजी दिग्दर्शक विशाल देवरुखकरसोबत लग्नगाठ बांधली आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहत आहेत. एकानंतर एक कलाकार लग्नबेडीत अडकताना दिसत आहेत. अक्षया देवधर-हार्दीक जोशी, आशय कुलकर्णी-सानिया गोडबोले, अभिनेता सुमीत पुसावळे आणि अभिनेता हरीश दुधाडे नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. तसेच 'रात्रीस खेळ चाले ३' (Ratris Khel Chale 3) फेम शेवंता म्हणजेच अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar) मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल देवरुखकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. दरम्यान आता कृतिकाच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

कृतिका तुळसकर हिने १४ डिसेंबर रोजी दिग्दर्शक विशाल देवरुखकरसोबत लग्न केले. ते दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या लग्नाला मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. कृतिकाने लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर तिने गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत शेवंताच्या भूमिकेतून कृतिका तुळसकर घराघरात पोहचली. कृतिका मागील १८ वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत आहे. तसेच ती अनेक नाटक आणि चित्रपटात झळकली आहे. ती कथ्थक विशारदही आहे. विशेष म्हणजे ती मानसोपचारतज्ञ म्हणूनही कार्यरत आहे.

तर दिग्दर्शक विशाल देवरुखकरने बॉईज, बॉईज २ आणि बॉईज ३ आणि  गर्ल्स चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

टॅग्स :रात्रीस खेळ चाले ३