रत्ना पाठक सांगतायेत, साराभाई व्हर्सेस साराभाई टेक टू म्हणजे लंबी रेस का घोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 16:05 IST
साराभाई व्हर्सेस सारभाई ही मालिका काही वर्षांपूर्वी खूपच गाजली होती. या मालिकेतील रोसेश, इंद्रवधन, माया, मोनिषा, साहिल या सगळ्याच ...
रत्ना पाठक सांगतायेत, साराभाई व्हर्सेस साराभाई टेक टू म्हणजे लंबी रेस का घोडा
साराभाई व्हर्सेस सारभाई ही मालिका काही वर्षांपूर्वी खूपच गाजली होती. या मालिकेतील रोसेश, इंद्रवधन, माया, मोनिषा, साहिल या सगळ्याच व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांवर भुरळ घातली होती. आता या मालिकेचा दुसरा सिझन म्हणजेच साराभाई व्हर्सेस साराभाई टेक टू प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या नव्या सिझनमध्ये या व्यक्तिरेखांसोबत आणखी काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. सतीश शहा, रत्ना पाठक, राजेश कुमार, सुमीत राघवन, रुपाली गांगुली यांसारखे कलाकार प्रेक्षकांना या सिझनमध्ये देखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. साराभाईच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या मालिकेचा दुसरा सिझन सध्या प्रेक्षकांना वेबसिरिजच्या रूपात पाहायला मिळत आहे. पण या दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. साराभाईच्या पहिल्या सिझन इतका हा सिझन मनोरंजक नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. याबाबत या मालिकेत माया साराभाईची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रत्ना पाठक यांनी आपले मत मांडले आहे. त्या सांगतात, दुसऱ्या सिझनचे सध्या काहीच भाग लोकांच्या भेटीस आले आहेत. खूपच कमी वेळात काहीही बोलणे हे अतिशय चुकीचे आहे आणि त्यात मी स्वतः सोशल मीडियाचा वापर करत नसल्याने लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया देत आहेत हे मला तितकेसे माहीत नाहीये. पण काही लोकांना दुसरा सिझन प्रचंड आवडला आहे तर काहींना दुसरा सिझन पहिल्या इतका मनोरंजक वाटत नाहीये असे मी ऐकले आहे. पण पहिला सिझन हा दहा वर्षांपूर्वी लोकांच्या भेटीस आला होता. गेल्या काही वर्षांत जग खूप बदलले आहे. त्यामुळे काळानुसार आम्ही देखील बदललो आहोत. या मालिकेची कथा खूपच चांगल्याप्रकारे लिहिली गेली आहे. तसेच प्रत्येक कलाकार खूप मेहनत घेत आहे. पहिल्या सिझनच्यावेळीदेखील सुरुवातीला आम्हाला खूप कमी टिआरपी होता. पण नंतर प्रेक्षकांना ही मालिका आवडायला लागली. त्यामुळे आम्ही लंबे रेस का घोडा आहोत असे मला वाटते. यावेळीदेखील प्रेक्षकांना काही काळानंतर ही मालिका अधिक आवडेल याची मला खात्री आहे. Also Read : ऐश्वर्या सखुजा दिसणार साराभाई व्हर्सेस साराभाईमध्ये