Join us  

पोरस मालिकेद्वारे ​रती पांडे करणार कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2017 12:18 PM

छोट्या पडद्यावर सध्या ऐतिहासिक मालिकांचा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहे. चंद्र-नंदिनी, प्रेम या पहेली - चंद्रकांता यांसारख्या अनेक कॉश्च्युम ...

छोट्या पडद्यावर सध्या ऐतिहासिक मालिकांचा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहे. चंद्र-नंदिनी, प्रेम या पहेली - चंद्रकांता यांसारख्या अनेक कॉश्च्युम ड्रामा मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या मालिकांनंतर आता आणखी एक ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका सोनी या वाहिनीवर सुरू होणार असून या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या मालिकेद्वारे रती पांडे छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.रती पांडे शादी ट्रीट, रात होने दो, हर घर कुछ कहता है, मिले जब हम तुम यांसारख्या मालिकांमध्ये झळकली होती. पण हिटलर दीदी या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपूर्वी तिने बेगुसराई या मालिकेत काम केले होते आणि आता ती छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. रती पोरस या मालिकेत झळकणार असून या मालिकेची निर्मिती स्वस्तिक प्रोडक्शन करणार आहे. ही मालिका एक ऐतिहासिक मालिका असून या मालिकेचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेसाठी सध्या कलाकारांची निवड केली जाते. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्यासाठी रती पांडेची निवड करण्यात आली आहे. रती पांडे या मालिकेत एका राजकुमारीची भमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. तिच्या व्यक्तिरेखेचे नाव अनुसूया असणार आहे. सध्या या मालिकेच्या वर्कशॉपना ती हजेरी लावत असून या मालिकेसाठी घोडेस्वारी, तलवारबाजी यांसारख्या गोष्टी ती शिकत असल्याचे म्हटले जात आहे. पण ही मालिका स्वीकारली असल्याबाबत रतीने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. अजूनही या मालिकेबाबत मी काहीही ठरवले नसल्याचे रतीचे म्हणणे आहे.