Join us
Daily Top 2Weekly Top 5

रश्मी देसाईने शॉर्ट ड्रेस घालून केला हॉट डान्स, फॅन्स म्हणाले- अरे दीदी, क्या हो गया?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 17:11 IST

रश्मी देसाई सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे.

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस 13 स्पर्धक रश्मी देसाई (Rashami Desai) कदाचित चित्रपटात किंवा मालिकांमध्ये दिसत नसले, परंतु तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. रश्मी देसाई सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय आहे आणि दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता रश्मीने तिचा एक धमाकेदार डान्स शेअर आहे जो चाहत्यांना खूप आवडतो आहे.

रश्मीच्या नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आकाशी रंगाचा ऑफ-शोल्डर स्लीव्हलेस टॉप आणि शॉर्ट स्कर्ट घातला आहे. 'अप' या प्रसिद्ध गाण्यावर ती नृत्य करताना दिसतेय. रश्मीचा चाहत्यांना हा डान्सचा व्हिडीओ आवडला आहे. 

रश्मीच्या या व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या मजेदार कमेंट्स करत आहेत. एका यूजरने कमेंट्मध्ये लिहिले, 'अरे दीदी क्या हो गया, तर दुसऱ्याने तिला घरीच राहण्याचा सल्ला देत लिहिले, घरी रहा बाहेर कोरोना आहे. 

 दिवसांपूर्वी रश्मी देसाईने तिचे हॉट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोशूटमध्ये रश्मी ब्लॅक कलरच्या ब्रालेटमध्ये दिसली होती. या फोटोंना चाहत्यांनीही चांगली पसंती दिली होती. वयाच्या 16 व्या वर्षी ग्लॅमर इंडस्ट्रीत आलेल्या रश्मीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं.'उतरन’ या मालिकेतील तिने साकारलेली तप्पूची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. हिंदी मालिकांसह रश्मीने भोजपुरी, असामी, गुजराती चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. 

टॅग्स :रश्मी देसाई