Join us

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, लग्नाचा व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 18:51 IST

सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नसराई पाहायला मिळत आहे. 'रंग माझा वेगळा' मालिकेत दीपाची मैत्रीण साक्षीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी घाटे (Manasi Ghate) हिने आज तिचा प्रियकर आकाश पंडीतसोबत लग्न केले.

सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नसराई पाहायला मिळत आहे. अमृता देशमुख-प्रसाद जवादे, सुरूची अडारकर-पियुष रानडे, मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे हे कलाकार जोडपे नुकतेच विवाहबंधनात अडकले. आज २५ डिसेंबर रोजी गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी यांनी लग्न केले. तसेच रंग माझा वेगळा मालिकेत दीपाची मैत्रीण साक्षीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी घाटे (Manasi Ghate) हिने देखील तिचा प्रियकर आकाश पंडीतसोबत लग्न केले. तिचा विवाह सोहळा ठाण्यात पार पडला. नुकताच तिच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे.

अभिनेत्री मानसी घाटे हिने आकाश पंडीतसोबत लग्नगाठ बांधली आहे. तिच्या लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. मानसीने लग्नाच्या वेळी मेरा पिया घर आया ओ रामजी गाण्यावर थिरकत लग्न मंडपात एंट्री केली. यावेळी तिने पिवळ्या रंगाची नववारी साडी नेसली होती. वधूच्या गेटअपमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिच्या लग्नाला रंग माझा वेगळा मालिकेतील कलाकारांनीही हजेरी लावली. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.

कोण आहे तिचा नवरा?मानसी घाटेचा नवरा आकाश पंडीत हा सिनेइंडस्ट्रीतलाच आहे. तो लाइटिंग डिझायनर म्हणून कार्यरत आहे. नुकताच सुहाना खान, अगस्त्य नंदाचा रिलीज झालेला आर्चीजसाठी काम केले आहे. 

वर्कफ्रंट...मानसी घाटेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती रंग माझा वेगळा या मालिकेतून साक्षीच्या भूमिकेतून ती घराघरात पोहचली आहे. तिची ही पहिलीच मालिका आहे.  

टॅग्स :स्टार प्रवाह