Join us  

रणधीर कपूर यांनी त्यांच्या घरातील सदस्यांच्या टोपण नावाविषयी सांगितले हे गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 6:33 PM

इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात अभिनेते रणधीर कपूर हजेरी लावणार आहेत. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले. हा कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचा त्यांचा अनुभव खूपच छान असल्याचे त्यांनी सांगितले. 

ठळक मुद्देमनीष पॉलने रणधीर कपूर यांना कपूर परिवारातील टोपण नावे डब्बू, चिंटू, लोलो आणि बेबो यांच्याबद्दल विचारले असता, रणधीर कपूर यांनी सांगितले की, “माझ्या आजोबांनी माझे नाव डब्बू ठेवले कारण माझा जन्म झाला तेव्हा मी खूप गोरा होतो. कुटुंबातली इतर नावे म्हणजे ऋषी कपूरसाठी चिंटू, करिश्मासाठी लोलो आणि करीनासाठी बेबो ही रणधीर यांनी दिलेली आहेत. पण ही नावे व्यक्तिमत्वास अनुरूप असली पाहिजेत असे त्यांना जाणवल्याने त्यांनी अशी नावे देणे बंद केले आहे. यामुळे रणबीरला दुसरे काही नाव नाहीये.

इंडियन आयडॉलच्या या सिझनला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस गाणी सादर करत आहेत. आता खूपच कमी स्पर्धक शिल्लक असून या मधून कोण विजेता ठरतोय याची सगळयांना उत्सुकता लागलेली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तसेच या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. 

इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात अभिनेते रणधीर कपूर हजेरी लावणार आहेत. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले. हा कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचा त्यांचा अनुभव खूपच छान असल्याचे त्यांनी सांगितले. 

करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांनी इंडियन आयडॉल 10 मध्ये रणधीर कपूरसाठी एक छान व्हिडिओ संदेश पाठवला होता. करिश्मा कपूर म्हणाली होती, “माझे वडील हे नेहमीच सकारात्मक विचार करतात. त्यांनी आम्हालाही नेहमी सकारात्मक आणि नम्र राहण्याची शिकवण दिली आहे. त्यांचे त्यांच्या सर्वच मुलांवर, नातवंडांवर खूप प्रेम आहे. ते न चुकता दररोज माझ्या मुलांना भेटायला येतात.”

करिना कपूरने देखील वडिलांसाठी भावनिक संदेश पाठवला होता. ती म्हणाली, “माझे वडील माझ्यासाठी मित्रापेक्षा अधिक आहेत. सर्व प्रकारच्या परिस्थितीत ते माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत.”

हे व्हिडिओ संदेश पाहिल्यावर रणधीर कपूर यांनी सांगितले की, त्यांच्या मुली तर त्यांच्या लाडक्या आहेत. पण मुलींपेक्षा माझी नातवंडं मला अधिक प्रिय आहेत.

मनीष पॉलने रणधीर कपूर यांना कपूर परिवारातील टोपण नावे डब्बू, चिंटू, लोलो आणि बेबो यांच्याबद्दल विचारले असता, रणधीर कपूर यांनी सांगितले की, “माझ्या आजोबांनी माझे नाव डब्बू ठेवले कारण माझा जन्म झाला तेव्हा मी खूप गोरा होतो. पण कुटुंबातली इतर नावे म्हणजे ऋषी कपूरसाठी चिंटू, करिश्मासाठी लोलो आणि करीनासाठी बेबो ही मी दिलेली आहेत. आता आम्हाला हे समजले आहे की, नावे ही व्यक्तिमत्वास अनुरूप असली पाहिजेत, त्यामुळे आम्ही अशी नावे देणे बंद केले आहे. यामुळे रणबीरला दुसरे काही नाव ठेवलेले नाही.”

इंडियन आयडॉल 10 चा हा भाग प्रेक्षकांना येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :इंडियन आयडॉलरणधीर कपूर