Join us  

Ramayan! रामाच्या भूमिकेसाठी पहिल्यांदा रिजेक्ट झाले होते अरूण गोविल, अशी मिळाली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 10:47 AM

‘रामायण’ मालिकेशी जुळलेला एक किस्सा...

80 च्या दशकात रामायण या मालिकेने सगळ्यांनाच वेड लावले होते. कोरोना संकटाच्या पाश्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. काल 28 मार्चपासून ही मालिका दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित करण्यात येत आहे. आज याच निमित्ताने रामायणशी जुळलेला एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत अरूण गोविल यांनी प्रभू रामाची भूमिका साकारली आहे, हे तुम्ही सगळेच जाणताच. या भूमिकेनंतर लोक अरूण गोविल यांना खरोखर प्रभू राम मानायला लागले होते.  अरूण गोविल जिथे जात तिथे लोक त्यांच्या पाया पडत. पण याच भूमिकेसाठी अरूण गोविल आधी रिजेक्ट झाले होते, हे तुम्हाला ठाऊक आहे का?होय, काही दिवसांपूर्वी खुद्द अरूण गोविल यांनी द कपिल शर्मा शोमध्ये हा खुलासा केला होता. ‘रामायण’ या मालिकेआधी अरूण गोविल यांनी रामानंद सागर यांच्यासोबत काम केले होते. रामानंद सागर हे ‘रामायण’ बनवत आहे, हे कळल्यावर अरूण गोविल यांनी राम बनण्याची इच्छा व्यक्त केली. पण रामानंद सागर यांनी त्यांना टरकवून लावले.

होय, अरूण गोविल यांनी कपिल शर्मा शोमध्ये सांगितले होते की, ‘ रामानंद सागर ‘रामायण’  बनवणार हे ऐकताच मी त्यांच्याकडे गेलो. मला रामाची भूमिका हवी, असे मी त्यांना म्हणालो.माझे शब्द ऐकून त्यांनी मला वरपासून खालपर्यंत पाहिले आणि ठीक आहे वेळ आली तेव्हा पाहू, म्हणून मला परत पाठवले, आता काही चान्स नाही म्हणून मी घरी परतलो. 

पण एकदिवस त्यांचा कॉल आला, त्यांनी मला ऑडिशनला बोलवले. माझे ऑडिशन झाले. पण ऑडिशनमध्ये मला रिजेक्ट केले गेले. यामुळे मी चांगलाच निराश झालो होतो. पण कदाचित राम बनणे माझ्याच नशिबात असावे. एकदिवस रामानंद सागर यांचा पुन्हा फोन आला. मला त्यांनी भेटायला बोलवले. मी त्यांच्या घरी गेलो आणि मला आनंदाची बातमी मिळाली. माझ्या टीमला तुझ्यासारखा राम मिळत नाहीये, तेव्हा तूच राम होणार, असे रामानंद सागर यांनी मला सांगितले आणि मला रामाची भूमिका मिळाली.’

टॅग्स :रामायण