Join us

'श्री कृष्‍णा' फेम सुनील नागरची बिकट अवस्था, घराचे भाडेही थकले, आर्थिक तंगीमुळे कुटुंबानेही सोडली साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 19:19 IST

रेस्टॉरंटमध्ये गाणे गाण्यासाठीही तयार झालो. तितक्यात लॉकडाऊन लागला आणि माझे कामही रखडले. गे

करिअरच्या ऐन भरात असताना या कलाकारांना रसिकांचं प्रेम, अमाप लोकप्रियता आणि बक्कळ पैसाही मिळतो. मात्र याच चित्रपटसृष्टीची जशी चांगली बाजू तशी दुसरी बाजूही आहे. कारण इथं उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. कालांतराने याच कलाकारांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही. यांत आणखी एका नावाची भर पडली आहे.

 

प्रसिद्ध अभिनेता सुनिल नागर श्री कृष्ण पौराणिक मालिकेतून प्रसिद्ध झाले होते. 'महाबली हनुमान', 'ओम नम: शिवाय', 'श्री गणेश' आणि 'कबूल है' यासारख्या मालिकांमध्येही ते झळकले होते.मात्र कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे हलाखीचं जीणं जगणं त्यांच्या वाट्याला आले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाने त्यांची साथ सोडली आहे. 

त्यांच्याकडे कोणतेच काम नव्हते. कोरोनामुळे ते अधिकच आर्थिक अडचणीत सापडले. शेवटी ओशिवरा येथे असलेले त्यांचे राहते घर विकून भाड्याच्या घरात सध्या राहत आहेत. सोशल मीडियावर मदतीसाठी आवाहनही करण्यात आले होते. त्यांच्या फोटोसह बँक डिटेलही शेअर करण्यात आली होती. अशाप्रकारे लोकांपुढे पैस्यांची मदत मागण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही.

कास्टिंग डिरेक्टर असलेल्या मित्राला माझी परिस्थिती सांगितल्यावर त्याने सोशल मीडियावर मदतीसाठी पोस्ट शेअर केली. या पोस्टमुळे सिंटाने देखील माझ्या मदतीसाठी पुढे आले आहेत. मला मदत करणार असल्याचे त्यांनी आश्वासन तर दिले आहेच पण माहिती नाही अजून किती वेळ लागेल. 

मी खूप चांगली काम इंडस्ट्रीत असताना केली आहेत.माझे काम रसिकांनाही आवडले. खूप चांगल्या चांगल्या ऑफर्स मिळत राहिल्या. कामात प्रचंड व्यस्त होतो. त्यावेळी खूप पैसाही कमावला. पण आज इंडस्ट्रीत आमच्यासारख्या कलाकारांसाठी कामच नाही. कितीदिवस इंडस्ट्रीवर अवलंबून राहणार म्हणून एका रेस्टॉरंटमध्ये मला गाणे गाण्याचीही ऑफर मिळाली होती. माझा आवाज चांगला आहे. रेस्टॉरंटमध्ये गाणे गाण्यासाठीही तयार झालो. तितक्यात लॉकडाऊन लागला आणि माझे कामही रखडले. गेल्या काही दिवसांपासून घराचे भाडेही थकले आहे. 

माझ्या या कठिण काळात ना मला इंडस्ट्रीतून काही मदत मिळते नाही माझ्या कुटुंबाने मला साथ दिली. सगळेच आज मला एकट्याला सोडून गेले आहेत. कोणालाच माझी काळजी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.