Join us  

VIDEO: राम कपूर आणि साक्षी तन्वरने दिला होता 17 मिनिटांचा इंटिमेट सीन, टेलिव्हिजन इंडस्ट्रीत माजवली होती खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 4:16 PM

राम कपूर आणि साक्षी तन्वर यांनी छोट्या पडद्यावरचा सगळ्यात बोल्ड सीन दिला होता.

बडे अच्छे लगते है मालिकेतून राम कपूर व साक्षी तन्वर ही जोडी लोकप्रिय ठरली. या जोडीने त्यांच्या केमिस्ट्रीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या जोडीने छोट्या पडद्यावरचा सगळ्यात बोल्ड सीन दिला होता ज्यामुळे ते खूप चर्चेत आले होते.

बडे अच्छे लगते है ही एकता कपूरची मालिका काही वर्षांपूर्वी चांगलीच गाजली होती. पण त्याचसोबत एका वेगळ्या कारणामुळे ही मालिका चर्चेत आली होती. या मालिकेत राम आणि साक्षीवर काही इंटिमेंट सीन चित्रीत करण्यात आले होते. कोणत्याही मालिकेत इतके बोल्ड सीन दाखवले जाण्याची बहुधा ती पहिलीच वेळ होती. त्यामुळे ही दृश्ये पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

बडे अच्छे लगते है या मालिकेत राम आणि साक्षी यांचे सुरुवातीला पटत नाही. पण कालांतराने ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात असे दाखवण्यात आले होते. त्यांच्यात निर्माण झालेली जवळीक दाखवण्यासाठी साक्षी आणि राम कपूरवर अनेक लव्ह मेकिंग सीन्स चित्रीत करण्यात आले होते. या सीन्सची दीर्घकाळ चर्चा रंगली होती. राम आणि साक्षीवर चित्रीत करण्यात आलेला हा इंटिमेट सीन हा तब्बल १७ मिनिटांचा होता. हा सीन मालिकेत दाखवल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप देखील नोंदवला होता.

मालिका या सगळ्या वयोगटातील लोक घरात एकत्र बसून पाहातात, त्यामुळे अशाप्रकारचे सीन मालिकेत दाखवणे चुकीचे असल्याची अनेकांनी टीका देखील केली होती. या कार्यक्रमाची निर्माती एकता कपूरने या मालिकेच्या काही वर्षांनंतर दिलेल्या एका मुलाखतीत हा सीन दाखवून मी चूक केल्याची कबूलीही दिली होती. राम आणि साक्षीची जोडी बडे अच्छे लगते है या मालिकेनंतर प्रचंड हिट झाली. त्यानंतर करले तू भी मोहोब्बत या वेबसिरिजमध्ये देखील ते दोघे एकत्र झळकले होते. या वेबसिरिजमधील त्यांच्या केमिस्ट्रीची देखील चांगलीच चर्चा रंगली होती.

टॅग्स :राम कपूर