Join us  

Bigg Boss 15 : खरंच की काय? राखी सावंतचा पती रितेश ‘बिग बॉस शो’चा कॅमेरामॅन आहे? काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 2:18 PM

Bigg Boss 15 : माझा नवरा NRI असल्याचं राखी सांगत होती. पण तो कोण, कुठला, कसा दिसतो, हे कळायला मार्ग नव्हता. अशात राखीचा पती रितेश पहिल्यांदा ‘बिग बॉस 15’च्या मंचावर आला...

ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) लग्न झाल्याचं ओरडून ओरडून सांगत होती. पण तिच्यावर विश्वास ठेवायला कुणी तयार होईना. माझा नवरा NRI असल्याचं राखी सांगत होती. पण तो कोण, कुठला, कसा दिसतो, हे कळायला मार्ग नव्हता. अशात राखीचा पती रितेश (Ritesh) पहिल्यांदा ‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) मंचावर आला आणि केवळ एवढंच नाही तर वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून राखीसोबत त्यानं बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली. 

मी बिहारचा असून बेल्जियममध्ये सॉफ्टवेअर प्रोफेशनल म्हणून काम करतो,असं रितेशनं सांगितलं. मी राखीचा पती असून आम्ही काही प्रोफेशनल कारणांमुळे लग्न लपवून ठेवलं होतं, असंही त्यानं सांगितलं. अर्थात तरीही हा खरंच राखीचा पती आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अगदी सलमाननेही राखीला गमतीगमतीत का होईना मनातील ही शंका बोलून दाखवली होती. हा खरंच तुझा नवरा आहे की, पती म्हणून यालाही भाड्यानं आणलंस? असा प्रश्न सलमाननं राखीला केला होता. यावर नाही नाही, हा खरंच माझा पती परमेश्वर आहे, असं राखी म्हणाली होती. मात्र तरीही लोक राखीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत.

आता काय तर राखीचा पती रितेशबद्दल एक ‘अफवा’ कानावर येतेय. होय, बिग बॉसबद्दलची बित्तंबातमी देणा-या ‘द रिअल खबरी’ या टिष्ट्वटर हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ‘अब ये अफवाह कौन फैला रहा है कि राखी सावंत का पती रितेश वास्तव में बिग बॉस टीम का कैमरामैन है,’ असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.आता ही पोस्ट किती खरी, किती खोटी ते आम्हाला माहित नाही. पण सध्या या पोस्टची अन् राखीच्या पतीची जोरदार चर्चा आहे.बिग बॉस 15 च्या घरात रितेश व राखी ही जोडी सध्या धुमाकूळ घालतेय. एन्ट्री करून एक दिवस होत नाही तोच रितेश करण कुंद्रावर भडकला होता.

टॅग्स :राखी सावंतबिग बॉस