Join us

या राखीचं करायंच तरी काय ? फोटो शेअर करत विचारतेय कोण आहे 'यातला' माझा नवरा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 13:11 IST

राखी सावंतचे सीक्रेट वेडिंग हे सगळ्यांनासाठी मिस्ट्री वेडिंग बनून राहिलं आहे. राखीचे सीक्रेट वेडिंग हे सोशल मीडियावर चर्चाचा विषय ठरला आहे.

राखी सावंतचे सीक्रेट वेडिंग हे सगळ्यांनासाठी मिस्ट्री वेडिंग बनून राहिलं आहे. राखीचे सीक्रेट वेडिंग हे सोशल मीडियावर चर्चाचा विषय ठरला आहे. लग्न झाल्या दिवसापासून राखीच्या नवऱ्याचा फोटो एकदाही समोर आलेला नाही. त्यामुळे राखीने नक्की कोणाशी लग्न केलंय, तिचा पती कोण आहे हे सगळं जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. राखीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती आपल्या पतीबाबतची माहिती देताना दिसतेय. या व्हिडीओ सोबत राखीने काही मुलांचे फोटो शेअर केलेत आणि यातील तिचा पती कोणता असा प्रश्न फॅन्सना विचारला आहे. 

राखी सांगते तिचा पती एनआरआय असून तो खूप स्मार्ट आणि हँडसम आहे.आम्ही लंडनमध्ये नवे घर खरेदी केले आहे. मी स्वयंपाकही शिकले आहे. चपाती आणि भाजीपासून सुरुवात केली,’ असे राखीने सांगितले होते. राखी बिग बॉसच्या १३व्या सीझनच्या ग्रॅण्ड प्रीमियरला परफॉर्म करणार आहे. बिग बॉसमध्ये राखी पहिल्यांदा त्याच्या नवऱ्याला जगासमोर आणणार आहे. याचा खुलासा खुद्द राखीनं काही दिवसांपूर्वी केला होता. 

राखीने 28 जुलैला एका पंचताराकित हॉटेलमध्ये मुंबईत गुपचुप लग्न केले. या सोहळ्याला केवळ 4-5 लोक हजर होते. लग्नाचा बोभाटा होऊ नये म्हणून, हॉटेलचा संपूर्ण हॉल बुक न करता हॉटेलच्या खोलीतच लग्नविधी पार पडला, असे राखीने सांगितले होते. त्यादिवसापासून राखीचं लग्न मिस्ट्री बनून राहिलं आहे. 

टॅग्स :राखी सावंत