Join us

राखी सावंतला व्हायचं आई, पण म्हणाली- मला विकी डोनरची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 17:03 IST

Rakhi Sawant wants to be a mother : राखी सावंत 'बिग बॉस 14' च्या घरात चांगलाच धुमाकुळ घालताना दिसली.

राखी सावंत 'बिग बॉस 14' च्या घरात चांगलाच धुमाकुळ घालताना दिसली.  बिग बॉसमध्ये राहुल वैद्य, रुबीना दिलाइक, निक्की तांबोळी आणि अली गोनी यांच्यासमवेत राखीने अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरी गाठल्यानंतर राखी शेवटच्या क्षणी 14 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडली. आता राखी सावंतला तिच्या वैवाहिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आता तिला आई व्हायची इच्छा आहे.

राखीला सिंगल मदर व्हायचे नाहीटाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना राखी म्हणाली की, तिला पती रितेशबरोबर मुलाचे संगोपन करायचे आहे. ती म्हणाले, 'मातृत्व जाणून घेणे ही माझी प्रायॉरिटी आहे.  मला माझ्या मुलासाठी कोणत्या विकी डोनरची गरज नाही, मला एका वडिलांची गरज आहे. मला सिंगल मदर व्हायचं नाही. मला नाही माहिती हे कसं होईल पण असचं होईल याची मला आशा आहे. मी माझं एग्ज फ्रिजिंग करुन ठेवलं आहे. 

राखीच्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात  कारण आजपर्यंत तिचा पती कधी दिसला नाही किंवा राखी ही कधी तिच्या पतीबरोबर  दिसली नाही. पण राखी कायम ती वैवाहिक असल्याचे सांगते. ती म्हणाला, 'रितेश अस्तित्त्वात आहे. मी त्याच्याशी लग्न केले आहे आणि आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. तो एक मोठा उद्योगपती आहे ज्याच्या हाताखाली बरेच लोक काम करतात. ' 

टॅग्स :राखी सावंत