Join us  

राखी सावंतला बघून नेटकऱ्यांना आली उर्फी जावेदची आठवण, फ्रंट ओपन थाई हाय स्लिट ड्रेस घालून झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 12:58 PM

ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या बोल्ड आणि सिझलिंग फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. फ्रंट ओपन थाई हाय स्लिट ड्रेस घातल्यामुळे राखी सावंत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या बोल्ड आणि सिझलिंग फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. पण आता राखीला पाहून असे वाटते की तिने इंटरनेट सेन्सेशन  उर्फी जावेदची कॉपी करायला सुरुवात केली आहे. राखीचे कपडे पाहिल्यानंतर अनेक यूजर्स तिचा लूक उर्फी जावेदची कॉपी असल्याचं बोलत आहेत.

राखीने उर्फीची कॉपी केली?एका कार्यक्रमात राखी सावंत लाल फ्रंट ओपन थाई हाय स्लिट ड्रेस परिधान करून पोहोचली. फ्रंट ओपन ड्रेस घालण्याचा ट्रेंड उर्फी जावेदने पॉप्युलर  केला आहे हे सर्वांनाच माहीत आहे. राखीचा बोल्ड फ्रंट ओपन थाई हाय स्लिट ड्रेस अनेक यूजर्सना उर्फी जावेदची आठवण आली. युजर्सनी राखीला तिच्या बोल्ड लूकवर ट्रोल करायला सुरुवात केली.

ग्लॅडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की राखी सावंतच्या ड्रेसच्या फ्रंट ओपन डिझाइनला क्रिस-क्रॉस कॉर्ड्ससह स्टायलिश लुक देण्यात आला आहे. ड्रेसच्या बाजूला देखील कटआउट डिझाइन आहे. या बोल्ड ड्रेससह राखीने मिडल पार्टेडसह  स्ट्रेट  लूक देऊन केस मोकळे सोडले आहेत. न्यूड लिपस्टिक आणि हेवी आय मेकअपमध्ये राखीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र उर्फी जावेदच्या कपड्यांची स्टाईल कॉपी केल्याने त्याला युजर्स तिला ट्रोल करतायेत. 

टॅग्स :राखी सावंतटिव्ही कलाकार