Join us  

राजेश शृंगारपुरे दिसणार 'या' ऐतिहासिक मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 7:15 AM

राणी लक्ष्मीबाईं यांच्या आयुष्यावर आधारित 'खूब लडी मर्दानी -झांसी की रानी' या मालिकेतून एका सामान्य मुलीपासून ते इंग्रजांशी लढणाऱ्या झाशीच्या राणी प्रवास दाखवण्यात येणार आहे

ठळक मुद्देमनकर्णिकेच्या वडिलांची भूमिका अभिनेता राजेश शृंगारपुरे साकारणार आहे

राणी लक्ष्मीबाईं यांच्या आयुष्यावर आधारित 'खूब लडी मर्दानी -झांसी की रानी' या मालिकेतून एका सामान्य मुलीपासून ते इंग्रजांशी लढणाऱ्या झाशीच्या राणी प्रवास दाखवण्यात येणार आहे. मनकर्णिकेच्या वडिलांची भूमिका अभिनेता राजेश शृंगारपुरे साकारणार आहे. राजेशने आपल्या भूमिकेच्या मागणीमुळे संपूर्ण केस काढले. खंबीर आणि निश्चयी असलेल्या मोरोपंतांची पेशव्यांवर श्रध्दा आहे. त्यांचा स्वतंत्रता लढ्यावर विश्वास आहे आणि त्यात येणाऱ्या अडथळ्यांमुळे ते निराश होत नाहीत. ते जरी सर्वांना कठोर म्हणून माहित असले तरी त्यांच्या स्वभावाची एक भावनाशील बाजू सुध्दा आहे आणि ती आहे एका प्रेमळ बापाची. गंमतीदार आणि विचित्र पोशाखात त्यांना प्रथम कधीही प्रश्न न विचारणाऱ्या मनकर्णिकेने पाहिले होते पण नंतर तिला कळाले की तो क्रांतीकारी आहेत.

आपल्या भूमिकेविषयी बोलताना तो म्हणाले, “सुरूवातीला मला टक्कल करताना थोडा संशय होता पण माझ्या पात्राची ती आवश्यकता होती आणि त्यामुळे मी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. खूब लडी मर्दानी- झांसी की रानी या महान कलाकृतीमध्ये काम करणे माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि मला आशा आहे की मी माझे पात्र पूर्ण श्रध्देने साकारेन. माझ्या पात्राला वेगवेगळ्या छटा आहेत आणि त्या वेळेनुसार प्रकट होणार आहेत. मला खात्री आहे की माझे हे रूपांतर प्रेक्षकांना आवडेल. मनकर्णिकेच्या ज्या प्रवासावर या शो मध्ये प्रकाश टाकला जाणार आहे तो अतिशय सुंदर आहे आणि मला प्रेक्षक तो कधी पाहतील असे झाले आहे.”

टॅग्स :राजेश श्रृंगारपुरेकलर्स