Join us  

राहुल सुधीरला 'या' ड्रेसिंगमध्येच जावे लागले मित्राच्या लग्नाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 11:20 AM

‘राजा बेटा’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी राहुल सुधीरला सतत कुठे ना कुठे जावे लागते. सध्या तो जयपूरमध्ये चित्रीकरण करत आहे. पण अलीकडेच तो आपल्या मित्राच्या लग्नाला उपस्थित राहिला खरा; पण मालिकेतील त्याच्या व्यक्तिरेखेचे कपडे घालूनच.

टीव्हीवरील व्यक्तिरेखा जिवंत करण्यात काही वाटा त्यांच्या वेशभूषेचाही असतो. तज्ज्ञवेशभूषाकाराने निवडलेले कपडे हे त्या व्यक्तिरेखेला रूपच देतात असे नव्हे, तर प्रेक्षकांना संबंधित कलाकार हा ती व्यक्तिरेखाच आहे, यावर विश्वास बसवतात. ‘झी टीव्ही’वर अलीकडेच सुरू झालेल्या ‘राजा बेटा’ या मालिकेचा नायक वेदांतची भूमिका साकारणारा कलाकार राहुल सुधीर हा आपल्या व्यक्तिरेखेच्या लूकवर फिदा झाला सावा, असे दिसते. मालिकेत तो एका तरूण स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरची भूमिका साकारत असून त्यासाठी तो परिधान करीत असलेल्या थ्री-पीस सुटात तो रुबाबदार दिसतो.

या मालिकेच्या चित्रीकरणासाठी राहुल सुधीरला सतत कुठे ना कुठे जावे लागते. सध्या तो जयपूरमध्ये चित्रीकरण करत आहे. पण अलीकडेच तो आपल्या मित्राच्या लग्नाला उपस्थित राहिला खरा; पण मालिकेतील त्याच्या व्यक्तिरेखेचे कपडे घालूनच. मालिकेचे दीर्घ काळ चाललेले चित्रीकरण पूर्ण करून राहुल सुधीरने जयपूर विमानतळाच्या दिशेने धाव घेतली आणि तो थेट दिल्लीत पोहोचला. तो सांगतो, “आपले कपडे एखाद्या कलाकाराला संबंधित व्यक्तिरेखेत कसं रुपांतरित करतात, ते पाहून मी थक्क झालो होतो.

 मला त्या दिवशी दिल्लीत मित्राच्या लग्नाला उपस्थित राहायचं होतं पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चित्रीकरण सुरू होतं. त्यामुळे जयपूर विमानतळावर माझं विमान पकडण्यासाठी मला अक्षरश: धावपळ करावी लागली आणि म्हणूनच मी मालिकेतील माझे कपडे न उतरविता तसाच विमानतळाव पोहोचलो. माझं विमान दिल्लीत पोहोचलं, तेव्हा मला काहीसा उशिरच झाला होता, त्यामुळे मला माझे कपडे बदलण्यासाठी वेळच मिळाला नाही. तरीही हा माझ्या जीवनातील सर्वात उत्तम अनुभवांपैकी एक म्हटला पाहिजे.”आपल्या मालिकेच्या चित्रीकरणाच्या प्रदीर्घ वेळापत्रकातून वेळ काढून मित्राच्या लग्नाला वेळेवर उपस्थित राहिल्याबद्दल राहुल सुधीरचे कौतुकच करावे लागेल.