नासिर खान आता झळकणार ये वादा रहा या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:50 IST
नासिर खानने आशिर्वाद या मालिकेद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आता तो ये वादा रहा या मालिकेत एका प्रमुख ...
नासिर खान आता झळकणार ये वादा रहा या मालिकेत
नासिर खानने आशिर्वाद या मालिकेद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आता तो ये वादा रहा या मालिकेत एका प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ये वादा रहा या मालिकेने नुकताच 15 वर्षांचा लीप घेतला. लीपनंतर या मालिकेत प्रेक्षकांना अनेक नव्या व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहेत. सोनल वेंगुर्ले या मालिकेत तिच्याच मुलीची म्हणजेच खुशीची भूमिका साकारणार आहे. तर झैन इमान या मालिकेत अबीरच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.नासिरने नुकतेच अम्मा आणि टशन-ए-इश्क या मालिकेत काम केले होते. वर्षभरात नासिरची ही तिसरी मालिका आहे. या मालिकेत तो प्रताप धर्माधिकारी ही भूमिका साकारत असून तो एका संगीत कंपनीचा मालक असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अबीर हा त्याचा मुलगा असून खुशी प्रतापला तिचा मार्गदर्शक मानते असे दाखवण्यात येणार आहे. या मालिकेविषयी नासिर सांगतो, "आशिर्वाद ही माझी पहिली मालिका झी वाहिनीवर दाखवली जात असे. तेव्हापासूनच या वाहिनीसोबत माझे एक वेगळे नाते आहे. गेल्या वर्षभरात अम्मा, टशन-ए-इश्क अशा दोन मालिका या वाहिनीसोबत केल्या आहेत आणि आता माझी या वाहिनीसोबत तिसरी मालिका आहे. त्यामुळे ही मालिका करायला मला अधिक मजा येत आहे. या मालिकेत अनेक तरुण कलाकार आहेत. त्यांच्यासोबत काम करताना मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतंय. प्रताप ही व्यक्तिरेखा खूपच माझ्यासारखी असल्याने या मालिकेचे चित्रीकरण करत असताना मी अभिनय करत आहे असे मला कधीच वाटत नाही."