स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta Serial). या मालिकेला अल्पावधीत प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या मालिकेत मुक्ताची भूमिका साकारणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिने अचानक मालिका सोडली. तिने मालिका का सोडली, यामागचे कारण समोर आलेले नाही. मात्र तेजश्रीच्या आधी आणखी एका अभिनेत्रीने मालिकेतून अचानक एक्झिट घेतली होती. ही अभिनेत्री म्हणजे मिहिकाची भूमिका साकारणारी मृणाली शिर्के (Mrunali Shirke). तिने ही मालिका का सोडली, हे देखील समजू शकले नाही. मात्र सध्या तिच्या हळदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यापूर्वी तिच्या केळवणाचा फोटो समोर आला होता. मृणाली लग्नबेडीत अडकते आहे अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. खरंच ती लग्न करते आहे का? हे जाणून घेऊयात.
अभिनेत्री मृणाली शिर्केचा काही दिवसांपूर्वी केळवणाचा फोटो समोर आला होता. त्यानंतर नुकताच तिच्या हळदी समारंभाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तिला हळद लावताना दिसत आहेत. खरंतर हा व्हिडीओ एका मालिकेतील शूटचा आहे. मृणाली सध्या स्टार प्लस वाहिनीवरील गुम है किसी के प्यार में मालिकेत काम करते आहे. यात ती जुहीची भूमिका साकारते आहे. या मालिकेत मराठमोळी अभिनेत्री मीरा सारंगदेखील आहे. तीदेखील या व्हिडीओत तिला हळद लावताना दिसते आहे. मालिकेत मृणालीच्या लग्नाचा सीक्वेन्स आहे आणि सध्या त्याचे शूटिंग सुरू आहे.
अभिनेत्री मृणाली शिर्के टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आहे. तिने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. तसेच ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. याशिवाय ती तिच्या भावासोबत मजेशीर रिल बनवत असते. तिच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.