Join us

प्राजक्ता माळी करणार लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 16:54 IST

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सनई चौघडे वाजवू लागले आहेत. मृण्मयी देशपांडे, चिराग पाटील, श्रुती मराठी, गौरव घाटणेकर यांच्यापाठोपाठ आता अभिनेत्री ...

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सनई चौघडे वाजवू लागले आहेत. मृण्मयी देशपांडे, चिराग पाटील, श्रुती मराठी, गौरव घाटणेकर यांच्यापाठोपाठ आता अभिनेत्री प्राजक्ता माळीदेखील विवाहबंधनात अडकणार आहे? घाबरू नका. प्राजक्ता रियल लाइफमध्ये नाही तर रील लाइफमध्ये लग्नबंधनात अडकताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हो, कारण प्राजक्ता लवकरच एका मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांना दिसणार आहे. या मालिकेचे नाव नकटीच्या लग्नाला यायचं हं.. असे आहे. ही मालिका लवकरच एका वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तिच्यासोबत कोण असणार आहे हे अदयापदेखील गुलदस्त्यात आहे. जुळुन येतील रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेनंतर प्रेक्षक पुन्हा तिला पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र आता तिच्या या आगामी मालिकेने प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळे तिच चाहते आनंदित झाले हे मात्र नक्की. प्राजक्ता यापूर्वी सुवासिनी, बंध रेशमाचे, गाणे तुमचे आमचे, सुगरण अशा अनेक मालिका केल्या आहेत.  तसेच तिने खो खो, संघर्ष, गोळाबेरीज असे अनेक मराठी चित्रपटदेखील केले आहेत. सध्या ती एका मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे. तिच्यासोबत या चित्रपटात ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी हे कलाकार पाहायला मिळणार आहे. प्रकाश कुंटे दिग्दर्शित हा चित्रपट असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे काही चित्रिकरण हंपी येथे करण्यात आले आहे. मालिका, चित्रपटांप्रमाणेच तिने रंगभूमीवरदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. त्यामुळे प्राजक्ताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे.