Join us  

व्वा दादा व्वा...! प्राजक्ता माळीच्या फोटोशूटवरचे मीम्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 3:15 PM

खुद्द प्राजक्ताने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर स्वत:वरचे काही भन्नाट व मजेशीर मीम्स शेअर केले आहेत. तिचे हे मीम्स सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

ठळक मुद्देछोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ता माळीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य, दिलकश अदा आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ता अल्पावधीतच रसिकांची आवडती अभिनेत्री बनलीये.

सोशल मीडियावरचे भन्नाट मीम्स म्हणजे आणखी एक मनोरंजन. होय, हे मीम्स पाहताना अनेकांना हसू आवरत नाही. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिच्यावरचे मीम्स पाहूनही तुम्ही असेच पोट धरून हसाल.होय, खुद्द प्राजक्ताने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर स्वत:वरचे काही भन्नाट व मजेशीर मीम्स शेअर केले आहेत. तिचे हे मीम्स सध्या तुफान व्हायरल होत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणा-या प्राजक्ताने नुकतेच स्वत:चे काही फोटो शेअर केले होते. तिने फोटो शेअर केलेत आणि पाठोपाठ त्याच्यावरचे मीम्स तयार झालेत. हेच मीम्स प्राजक्ताने शेअर केले आहेत. (Prajakta Mali trending memes viral on social media )

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ता माळीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य, दिलकश अदा आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ता अल्पावधीतच रसिकांची आवडती अभिनेत्री बनलीये.प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो, व्हॅकेशनचे फोटो प्राजक्ता सोशल मीडियावर पोस्ट करत असते.  मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे.  2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून प्राजक्ताने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. 

पहा पोट धरुन हसवणारे भन्नाट मीम्स ...

बस मध्ये काही प्रवासी जागा अडवून धरताना....

व्वा दादा व्वा...!

जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांवर रुसून बसता आणि सगळे तुम्हाला जेवायला बोलावतात.. तेव्हा तुम्ही...

MHJ करत असताना 'प्राजक्ता माळी' फरसाण खाते... 

टॅग्स :प्राजक्ता माळी