Join us

प्राजक्ता गायकवाडचं ठरलं! अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी, लवकरच लग्नाचा बार उडणार

By देवेंद्र जाधव | Updated: August 1, 2025 10:23 IST

Prajakta Gaikwad Getting Married: प्राजक्ता गायकवाडने लग्न ठरल्याची खास बातमी सर्वांना दिली आहे. प्राजक्ताचं सर्वांनी अभिनंदन केलंय

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत येसूबाईंच्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री. प्राजक्ता गायकवाडला आपण विविध सिनेमा, मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. अशातच प्राजक्ताने नुकतीच सर्वांना एक आनंदाची बातमी दिली आहे त्यामुळे सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. प्राजक्त गायकवाडचं लग्न ठरलं आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे.

प्राजक्ता गायकवाडचं लग्न ठरलं

प्राजक्ता गायकवाडने सोशल मीडियावर चार फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत मागे प्राजक्ताचे नातेवाईक पाहायला मिळत आहेत. याशिवाय प्राजक्ताने भलामोठा हार घातला असून दागिने परिधान केले आहेत. याशिवाय कपाळावर कुंकु लावलं आहे. प्राजक्ता सर्व पाहुण्यांना हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे. प्राजक्ताने हे फोटो पोस्ट करुन कॅप्शन लिहिलं की, "प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा….".  अशाप्रकारे प्राजक्ताने हे फोटो पोस्ट करुन तिचं लग्न ठरल्याची आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे.

कोण आहे प्राजक्ताचा होणारा नवरा?

प्राजक्ता गायकवाडचा होणारा नवरा कोण हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. अभिनेत्रीने याविषयी अद्याप खुलासा केला नाहीये. त्यामुळे प्राजक्ताचा होणारा नवरा कोण याची उत्सुकता शिगेला आहे. प्राजक्ताने लग्नाचा खुलासा केल्याने ती होणाऱ्या नवऱ्याबद्दलही लवकरच सांगेल, अशी शक्यता आहे. प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, 'आई माझी काळूबाई', 'स्वराज्यरक्षक संभाजी' अशा मालिकांमध्ये तिने अभिनय केला. प्राजक्ताच्या नवीन प्रोजेक्टबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

टॅग्स :प्राजक्ता गायकवाडस्वराज्य रक्षक संभाजीलग्नटिव्ही कलाकार