Join us

'पोस्ट ऑफीस उघडं आहे...', सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 12:16 IST

सोनी मराठी वाहिनीवर आपल्याला एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांनी नुकतीच पाहिली आहे.

 सोनी मराठी वाहिनीवर आपल्याला एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे.  या मालिकेची पहिली झलक    प्रेक्षकांनी नुकतीच पाहिली आहे. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' असे या मालिकेचे नाव आहे आणि ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच दाखल होणार आहे.

वेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ह्या मालिकेची ही झलक प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरते आहे. सोशल मिडियावरही  तिची वाहवा होते आहे.

पोस्ट ऑफीस उघडं आहे...' मालिकेच्या विषयाला धरून प्रेक्षकांची उत्सुकता वाढते आहे. ज्यांनी पोस्ट ऑफिसचा काळ अनुभवला आहे, ज्यांनी तो काळ अनुभवला नाहीये त्यांच्यासाठीही चर्चेचा विषय ठरली आहे.  नेहमीच्या चौकटीतून बाहेर पडून या मालिकेत एक हलकाफुलका विषय पाहायला मिळेल. 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ह्या मालिकेतून पोस्ट ऑफिस हा विषय सोनी मराठी वाहिनी घेऊन येते आहे. ही हास्याची मनी ऑर्डर महाराष्ट्राला नक्कीच आवडेल.  पाहायला विसरू नका  नवी मालिका - 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...', लवकरच सोनी मराठी वाहिनीवर.

टॅग्स :सोनी मराठी