Join us  

म्हणून पूजा सावंतने मानले चाहत्यांचे आभार, जाणून घ्या यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 2:32 PM

'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं.

पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूजा सध्या 'महाराष्ट्राच्या बेस्ट डान्सर'मध्ये परिक्षकाची भूमिका साकारते आहे.

पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती ही पूजा तिच्या फॅन्सना देत असते. अलीकडेच पूजाने तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. वाढदिवसाच्या दिवशी केलेल्या सेलिब्रेशनचे फोटो पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना पूजाने वाढदिवसाच्या दिवशी दिलेल्या शुभेच्छांसाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पूजा खूपच ग्लॅमरस दिसतेय. 

चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'क्षणभर विश्रांती' या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यानंतर 'आता गं बया', 'झकास', 'सतरंगी रे', 'दगडी चाळ', 'नीळकंठ मास्तर' अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आता मराठी रसिकांची मनं जिकंल्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही एंट्री केली.

 

टॅग्स :पूजा सावंत