Join us  

पूजा बिरारी दिसणार 'स्वाभिमान' या नव्या मालिकेत, साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 7:00 AM

पूजाने साजणा आणि ऑलमोस्ट सफळ संपूर्ण मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

अभिनेत्री पूजा बिरारी सोशल मीडियावर सक्रिय असते. आपले फोटो, चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो आणि आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना ती सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. पूजाने साजणा  आणि ऑलमोस्ट सफळ संपूर्ण मालिकांमध्ये अभिनय केला आहे. लवकरच पूजाची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्वाभिमाान' शोध अस्तित्त्वाचा... या स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या नव्या मालिकेत पूजा पल्लवी नावाची भूमिका साकारणार आहे.  एका छोट्या गावात वाढलेल्या पल्लवीचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न आहे.

स्वप्नांचा पाठलाग करत ती तिचं ध्येयं कश्या पद्धतीने गाठते याची रंजक गोष्ट स्वाभिमान मालिकेतून  उलगडेल. यासोबतच सर्वांचा लाडका अभिनेता अक्षर कोठारी, आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित अशी दमदार कलाकारांची फौज मालिकेत पाहायला मिळेल. स्वाभिमान मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘स्वाभिमान हा एका मुलीच्या, बाईच्या आयुष्यातला दागिना आहे जो तिने अभिमानाने मिरवायला हवा. स्वाभिमान हे तिचं अस्तित्व आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते कधीही हरवता कामा नये हे या मालिकेतून रसिकांना पाहायला मिळेल. माणसाने स्वाभिमानी असावं ती त्याची ओळख असते.’ 

स्टार प्रवाह प्रस्तुत ‘स्वाभिमान’ या मालिकेची निर्मिती फ्रेम्स प्रोडक्शनने केली असून कल्पेश कुंभार दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. स्वाभिमान’ २२ फेब्रुवारीपासून सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाह