Join us

सोनालीने चालवली हातगाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 23:19 IST

जेव्हा एक स्टार सेलेब्रिटी हातगाडी चालविते.

 बॉलीवुडप्रमाणेच मराठी कलाकारांचे देखील बाईक रायडिंग प्रेमाच्या चर्चा सतत ऐकत असतो. नुकतेच नाना पाटेकर यांनी बुलेट रायडिंगची राइड घेतलेले फोटोदेखील आपण पाहिले आहे. पण जेव्हा, मराठी इंडस्ट्रीप्रमाणेच बॉलीवुडमध्येदेखील आपली ओळख निर्माण करणारी सोनाली कुलकर्णी हीने चक्क हातगाडी चालवली.आश्चर्य वाटले ना, हातगाडी चालविण्याचा विचार देखील कोणी मनात आणत नाही. पण जेव्हा एक स्टार सेलेब्रिटीच हातगाडी चालवितो, त्यावेळी एक मोठा आदर्श समाजासमोर ठेवला जातो. कोणत्या वर्गाचा भेदभाव न करता माणुसकीचे दर्शन घडविणारे समाजकार्य सोनाली कुलकर्णी हिने केले आहे.एवढयावरच ती थांबली नाही तर ती म्हणते, हातगाडी ही आपल्या देशातील ट्रान्सपोर्टसाठी वापरणारे अव्दितीय साधन आहे. या हातगाडीची राइड घेऊन खरचं मला खूप आनंद झाला.