Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 17 : मराठमोळ्या अंकिता लोखंडेचा नादखुळा! पती विकी जैनसह 'बिग बॉस १७'च्या घरात दमदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 22:53 IST

अंकिताने पती विकी जैनसह 'बिग बॉस १७'च्या घरात पाऊल टाकलं. 'बिग बॉस'च्या घरात मराठमोळ्या अंकिताला पाहून चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. 

'पवित्र रिश्ता' मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. अर्चना हे पात्र साकारून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने आता 'बिग बॉस'च्या घरात धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. अंकिताने पती विकी जैनसह 'बिग बॉस १७'च्या घरात पाऊल टाकलं. 'बिग बॉस'च्या घरात मराठमोळ्या अंकिताला पाहून चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. 

नुकताच 'बिग बॉस १७'चा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. अंकिताने पती विकी जैनसह रोमँटिक गाण्यावर डान्स करत प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला. गेल्या कित्येक दिवसापासून अंकिताच्या 'बिग बॉस'च्या घरातील एन्ट्रीची चर्चा रंगली होती. तिने आता अखेर अंकिताला 'बिग बॉस'च्या घरात पाहून चाहतेही आनंदी आहेत. आता अंकिता पती विकीसह चाहत्यांचं किती मनोरंजन करणार, घरात टिकून राहण्यासाठी कोणते नवे डावपेच आखणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

अंकिताने मालिकांबरोबरच अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका'मध्ये ती दिसली होती. अंकिताने २०२१मध्ये व्यावसायिक विकी जैनबरोबर लग्नगाठ बांधली. अंकिता आणि विकीने याआधी 'स्मार्ट जोडी' या शोमध्येही सहभाग घेतला होता. 

दरम्यान, यंदाच्या 'बिग बॉस'च्या नव्या पर्वाची थीम सिंगल विरुद्ध कपल अशी असणार आहे. अंकिता आणि विकीबरोबर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांनीही 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली आहे.

टॅग्स :बिग बॉसअंकिता लोखंडे