Join us  

आहिल्यादेवींसमोर पारु आणणार दिशाचं सत्य; मालिकेत येणार ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 7:02 PM

Paru: दिशाचं सत्य समजल्यावर काय असेल अहिल्यादेवीची प्रतिक्रिया?

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'पारू' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विशेष म्हणजे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे या मालिकेविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. पारुची आता किर्लोस्करांच्या घरात एन्ट्री झाली आहे. इतकंच नाही तर पारुवर असलेली अहिल्यादेवींची नाराजी सुद्धा आता दूर झाली आहे. यामध्येच आता पारुला दिशाचं एक सत्य कळणार आहे. 

सध्या किर्लोस्करांच्या घरात प्रितम आणि दिशा यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. प्रितमने दिशासोबत लग्न करावं यासाठी आहिल्यादेवी आग्रही आहेत. मात्र, प्रितमला तिच्यासोबत अजिबात लग्न करायचं नाही. यामध्येच आता दिशाच्या बॉयफ्रेंडचं सत्य पारुला कळणार आहे.

नुकतेच किर्लोस्करांच्या घरी विदेशी क्लाएंट आले असतात.  परंतु, त्यांच्यासमोर प्रितमला प्रेझेंटेशन देता येत नाही. परिणामी, तो मिटींग अर्ध्यावर सोडून जातो. यावेळी बाहेर पडल्यानंतर त्याला दिशाचा बॉयफ्रेंड असल्याचं कळतं. विशेष म्हणजे ही गोष्ट तो पारुला सांगतो आणि दिशाला अद्दल घडवण्यासाठी प्लॅन करतो. 

दरम्यान, प्रितमची ही अवस्था पारूला बघवत नाही. त्यामुळे ती त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करते. मात्र, पारु आणि प्रितममधील हे बोलणं आदित्य ऐकतो. परिणामी,पारु प्रितमला लग्न न करण्याविषयी सल्ला देत असल्याचा समज आदित्यचा होतो. आता दिशाचं सत्य पारुला समजल्यानंतर ती हे सत्य आहिल्यादेवींसमोर आणेल का? आदित्यचा गैरसमज दूर होईल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार