Join us  

अस्सा नवरा सुरेख बाई! प्रेग्नंसी काळात मोहित मलिक पत्नी अदितीची घेतोय अशी काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 3:31 PM

मोहित आणि अदितीची पहिली भेट, 'बनू मै तेरी दुल्हन' मालिकेच्या सेटवर झाली होती.एकमेकांना अनेकवर्ष डेट केल्यानंतर  डिसेंबर २०१० मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले होते.

टीव्ही इंडस्ट्रीतील मोहित मलिक आणि अदिती मलिक सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. मोहित अदितीची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.टीवीवरील मोस्ट पॉप्युलर कपल म्हणून दोघांना ओळखले जाते.या कपलच्या आयुष्यात लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. 

विशेष म्हणजे लग्नाच्या दहा वर्षानंतर या कपलच्या आयुष्यात बाळाचे आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या दोघेही खूप आनंदी असून बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. अदितीने बेबी बंम्प शेअर करत तिची गुड न्युज चाहत्यांसह शेअर केली होती. एका मुलाखती दरम्यान मोहितने सांगितले की जेव्हा अदितीने त्याला गरोदरपणाबद्दल सांगितले तेव्हा तो शूटवर होता. 

तो म्हणाला, "मी खरोखर आनंदी आहे. आदितीने मला फोनवर सांगितले की सर्व टेस्ट पॉझिटीव्ह आहेत. तेव्हा मला वाटलं ती कोरोना टेस्टबद्दल बोलत आहे. त्यावेळी मी घाबरलो होतो पण नंतर मला तिने गरोदर असल्याचे सांगितले तेव्हा मात्र माझा आनंद गगणात मावेनासा झाला होता. या क्षणाची आम्ही दोघेही आतुरतेने वाट पाहात होतो आणि तो क्षण मी अनुभवत होतो.

मोहित आणि अदितीची पहिली भेट, 'बनू मै तेरी दुल्हन' मालिकेच्या सेटवर झाली होती.एकमेकांना अनेकवर्ष डेट केल्यानंतर  डिसेंबर २०१० मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले होते.

 

मोहित अभिनय क्षेत्रात काम करत असून अदितीने मात्र ब्रेक घेतला होता.रेस्टॉरंटचा बिझनेसमध्येच तिने काम करण्यास सुरूवात केली. अदिती सध्या तिची प्रेग्नंसी एन्जॉय करतेय.