Join us

क​पिलच्या सेटवर पॅरालिम्पिकवीर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 14:09 IST

'द कपिल शर्मा शो'मध्ये विविध सेलिब्रिटी मंडळी येतात आणि रसिकांचं धम्माल मनोरंजन करतात. आजवर कपिलच्या शोमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीच्या अनेक ...

'द कपिल शर्मा शो'मध्ये विविध सेलिब्रिटी मंडळी येतात आणि रसिकांचं धम्माल मनोरंजन करतात. आजवर कपिलच्या शोमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीच्या अनेक तारे तारकांनी हजेरी लावलीय. शिवाय विविध क्षेत्रातील दिग्गजही कपिलच्या शोमध्ये सहभागी झालेत. यांत क्रिकेटर, टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटनस्टार सायना नेहवाल यांचाही समावेश आहे. आता कपिलच्या शोमध्ये खास पाहुणे हजेरी लावणार आहेत. रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचं नाव उंचावणारे ऍथलिट कपिलच्या शोमध्ये येणार आहे. पॅरालिम्पिकमध्ये मरियप्पन थंगवेल, देवेंद्र झंझारिया, वरुणसिंह भाटी आणि दीपा मलिक यांनी पदक जिंकत भारतीयांची मान उंचावली होती. आता हेच पॅरालिम्पिकवीर कपिलच्या शोमध्ये अवतरणार आहेत.