पंकजला आजोबा बनायचे नाहीये
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 12:50 IST
पंकज विष्णू सध्या ये वादा रहा या मालिकेत काम करत आहे. ही मालिका लवकरच सात वर्षांचा लीप घेणार आहे. ...
पंकजला आजोबा बनायचे नाहीये
पंकज विष्णू सध्या ये वादा रहा या मालिकेत काम करत आहे. ही मालिका लवकरच सात वर्षांचा लीप घेणार आहे. पण लीपनंतर पंकजने मालिका सोडण्याचे ठरवले आहे. कारण पंकज सध्या मालिकेत एका मुलीच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. लीप घेतल्यानंतर त्याला या मालिकेत आजोबांची भूमिका साकारावी लागणार होती. पण करियरच्या या टप्प्यावर आजोबांची भूमिका साकारण्याची तयारी नसल्याने पंकजने ही मालिका सोडली असल्याचे म्हटले जात आहे.