Join us  

लग्नाच्या १२व्या दिवसानंतर बिग बॉस ४ फेम ही अभिनेत्री नवऱ्यापासून झाली विभक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 4:52 PM

ही अभिनेत्री बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये सहभागी झाली होती आणि त्यावेळी ती चर्चेतही आली होती.

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल व रिएलिटी शो बि ग बॉस सीझन ४ची कंटेस्टंट पामेला एण्डरसन तिच्या पाचव्या नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. तिने हॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता जॉन पीटर्ससोबत लग्न केले होते. लग्नाच्या १२ दिवसानंतर पामेला एण्डरसनने जॉन पीटर्ससोबत लग्न तोडले. त्यानंतर पुन्हा एकदा पामेला तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. पामेला एण्डरसन व जॉन पीटर्सने बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

इंग्रजी वेबसाइट फॉक्स न्यूज नुसार, शनिवारी पामेला एण्डरसन व जॉन पीटर्स यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ते दोघे २० जानेवारीला लग्नबेडीत अडकला होते. रिपोर्टनुसार पामेला एण्डरसनने विभक्त होण्याबाबत नुकताच खुलासा केला.

पामेला म्हणाली की, मी व जॉने चांगल्या वळणावर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या समर्थनासाठी मी आभारी आहे. आम्हाला दोघांना पुनर्मुल्यांकन करण्याची गरज आहे की आम्हाला दोघांना जीवनातून काय हवे आहे?

ती पुढे म्हणाली की, जीवन प्रेमासारखा सुंदर प्रवासासारखा आहे जे सर्वात मोठे सत्य आहे. आम्ही विचारपूर्वक निर्णय  घेतला आहे. सध्या आम्ही दोघांनी लग्नाचे सर्टिफिकेटची फॉर्मिलिटी टाळतो आहे. आमच्या खाजगी गोष्टींचा सन्मान ठेवण्यासाठी आभार.

फॉक्सच्या रिपोर्टनुसार पामेला एण्डरसन जॉन पीटर्सला बऱ्याच काळापासून ओळखते आहे. पण ती कधीच त्याच्यासोबत राहिली नाही. त्यामुळे तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :बिग बॉस