पल्लवी प्रधानचा 'जीजी माँ' मालिकेमध्ये बदलला लूक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 15:41 IST
अभिनेता किंवा अभिनेत्री बनण्याबद्दलची एक खास गोष्ट अशी आहे की त्यांना एकाच प्रकारची भूमिका करावीशी वाटत नाही. चांगल्या कलाकारांना ...
पल्लवी प्रधानचा 'जीजी माँ' मालिकेमध्ये बदलला लूक !
अभिनेता किंवा अभिनेत्री बनण्याबद्दलची एक खास गोष्ट अशी आहे की त्यांना एकाच प्रकारची भूमिका करावीशी वाटत नाही. चांगल्या कलाकारांना नेहमीच वेगवेगळ्या भूमिका करायच्या असतात. श्रीमंत आणि उच्चवर्णीय उत्तरा देवीची भूमिका करणारी पल्लवी प्रधान आता स्टार भारतवरील शो 'जीजी माँ'मध्ये कामवाल्या बाईची भूमिका करताना दिसून येणार आहे. आपल्या भूमिकेतील बदलाबद्दल ती अतिशय उत्साहात आहे. अर्थातच तिच्यासाठी ते आव्हानात्मक ठरणार आहे, त्यामुळे ही नवीन भूमिका ती कशी साकारेल हे पाहणे रोचक ठरेल. पण यात ती नक्कीच यशस्वी होईल यात शंका नाही. ह्याबद्दल पल्लवी प्रधान ऊर्फ उत्तरा देवी म्हणाली, “मला वाटतं कुठल्याही प्रकारची भूमिका करण्यास तयार असणे हेच एका कलाकारासाठी महत्त्वाचे आहे. वेगळ्या प्रकारच्या भूमिका करणे हे कलाकाराचे काम आहे. स्क्रिप्टच्या गरजेनुसार कुठल्याही प्रकारची भूमिका करायला मला कमीपणा वाटत नाही. मला माझे हे प्रोफेशन आवडते आणि त्यासोबत येणारी आव्हाने मी खिलाडूवृत्तीने स्वीकारते.”.नुकतेच ‘जीजी माँ’ मालिकेतील एका विवाहाच्या प्रसंगासाठी सर्व कलाकार अलीकडेच राजस्थानातील जयपूरमध्ये चित्रीकरण करीत होते.त्यात सुयश रावत या नवर्या मुलाची भूमिका साकारणारा दिशंक अरोराने मोठ्या ऐटीत आपले आगमन केले! विवाहासाठी नव-या मुलाचे आगमन दणक्यात आणि नेत्रदीपक पध्दतीने व्हावे,असे मालिकेच्या निर्मात्यांनी ठरविले होते.त्यासाठी हेलिकॉप्टरमधून त्याचे आगमन होईल,असे ठरविण्यात आले. मात्र चित्रीकरणाच्या वेळी जोरदार वारा वाहू लागल्याने हेलिकॉप्टरच्या वैमानिकाने सुरुवातीला ते जमिनीवर उतरविण्यास नकार दिला.त्यामुळे चित्रीकरण काही काळ खोळंबून राहिले. पण मालिकेचे निर्माते जय मेहता यांनी वरिष्ठ अधिका-यांकडून मंजुरी मिळविली आणि ते चित्रीकरण पार पाडले.