कर्मफलदाता शनी फेम कार्तिकेय मालवीय या बालकलाकाराचे झाले ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 10:45 IST
कलर्सचा वाहिनीवरील कर्मफलदाता शनी या पौराणिक मालिकेला सध्या प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड ...
कर्मफलदाता शनी फेम कार्तिकेय मालवीय या बालकलाकाराचे झाले ऑपरेशन
कलर्सचा वाहिनीवरील कर्मफलदाता शनी या पौराणिक मालिकेला सध्या प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत जुही परमारने शनीदेवाच्या पत्नीची भूमिका साकारली आहे तर सलील अंकोलाने सुर्यदेवाची भूमिका साकरली आहे.शनीदेवाची भूमिका कार्तिकेय मालवीयने या बालकलाकारने साकरली आहे. कार्तिकेयचा अभिनय तर प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. आता ही मालिका दहा वर्षांचा लीप घेणार असून कार्तिकेय प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत रोहित खुराणा आता शनीदेवाच्या भूमिकेत दिसणार आहे. कार्तिकेय मालवीय आता मालिकेत नसल्याने त्याचे फॅन्स त्याला प्रचंड मिस करणार आहेत. पण त्याच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. कार्तिकेयचे नुकतेच ऑपरेशन झाले असून तो सध्या रुग्णालयात आहे. कार्तिकेयचे कर्मफलदाता शनी या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच संपले. या मालिकेचे चित्रीकरण करत असताना त्याला संवाद बोलताना प्रचंड त्रास होत असे. तसेच सतत संवाद बोलायला लागत असल्याने त्याचा त्रास वाढतच होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला घशाचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. कोकीळाबेन रुग्णायलात २५ तारखेला त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आले. त्याचे घशाचे ऑपरेशन एकदम व्यवस्थित झाले असून त्याची तब्येत आता सुधारत आहे. कार्तिकेयच्या आईने टेलीचक्कर या वेबसाईटशी बोलताना सांगितले, कार्तिकेयची तब्येत आता चांगली असून त्याला लवकरच डिस्चार्ज देखील देण्यात येणार आहे. कुमार तेवरी, रितेश कौल, राहुल तेवारी आणि ताहिर या मालिकेतील टीममधील मंडळींनी आम्हाला नेहमीच खूप पाठिंबा दिला. प्रोडक्शन हाऊसने आणि सगळ्या टीमने आम्हाला दिलेल्या पाठिंब्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. कार्तिकेयच्या फॅन्सने त्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे देखील आभार मानतो. कार्तिकेय मालवीय इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या कार्यक्रमात झळकला होता. या कार्यक्रमातील दुसऱ्या सिझनमधील त्याच्या परफॉर्मन्सचे चांगलेच कौतुक झाले आहे. याच कार्यक्रमामुळे कार्तिकेया लोकप्रियता मिळाली. कर्मफलदाता शनी या कार्यक्रमातील कार्तिकेयच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले गेले आहे. या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. Also Read : सलील अंकोला घेणार कर्मफलदाता शनी या मालिकेतून एक्झिट