Join us

​खुलता कळी खुलेनाचे विक्रांत आणि मानसीची पुन्हा झाली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 16:01 IST

खुलता कळी खुलेना ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड लाडकी होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या ...

खुलता कळी खुलेना ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड लाडकी होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या मालिकेतील विक्रांत आणि मानसीची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत विक्रांतची भूमिका ओमप्रकाश शिंदेने साकारली होती. या आधी प्रेक्षकांना तो का रे दुरावा या मालिकेत पाहायला मिळाला होता. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे देखील प्रेक्षकांनी कौतुक केले होते. का रे दुरावा या मालिकेत साहाय्यक भूमिकेत असलेल्या ओमप्रकाशला खुलता कळी खुलेना या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि त्याने या भूमिकेचे अक्षरशः सोने केले. या मालिकेत मयुरी देशमुख मानसीच्या भूमिकेत दिसली होती. मानसी आणि विक्रांतची मालिकेतील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.ओमप्रकाश शिंदे आणि मयुरी देशमुख या दोघांच्या खुलता कळी खुलेना या मालिकेत मुख्य भूमिका असल्याने त्या दोघांचे चित्रीकरण एकत्रच असायचे. त्यामुळे चित्रीकरणाच्या वेळी दिवसातील अनेक तास ते एकमेकांसोबत घालवत असत. या मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यान त्या दोघांची घट्ट मैत्री जमली होती. आज ही मालिका संपून काही महिने झाले असले तरी या दोघांची मैत्री कायम आहे. मयुरी आणि ओमप्रकाश त्यांच्या कामात कितीही व्यग्र असले तरी वेळात वेळ काढून हे दोघे एकमेकांना आवर्जून भेटतात. या दोघांची नुकतीच भेट झाली होती. या भेटीचे फोटो ओमप्रकाशने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटला नुकतेच पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये मयुरी आणि ओमप्रकाश आपल्याला फालुदा खाताना दिसत आहेत. या फोटोसोबत ओमप्रकाशने एक खूप छान कॅप्शन देखील दिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, दो दोस्त एक गिलास में फालुदा खाएंगे, इससे वजन कम बढता है.... या त्याच्या फोटोवर आणि कॅप्शनवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून त्याच्या या कॅप्शनचे भरभरून कौतुक केले जात आहे. तसेच या फोटोला अनेकांनी लाइक देखील केले आहे. Also Read : ​खुलता कळी खुलेना फेम ओमप्रकाश शिंदे म्हणजेच विक्रांतची अशी झाली होती फजिती