Join us

एक था राजा एक थी राणी या मालिकेतील सरताज गिलचा अल-पचिनो लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 14:48 IST

एक था राजा एक थी राणी या मालिकेत प्रेक्षकांना आता सरताज गिलचा एक वेगळा लूक पाहायला मिळणार आहे. या ...

एक था राजा एक थी राणी या मालिकेत प्रेक्षकांना आता सरताज गिलचा एक वेगळा लूक पाहायला मिळणार आहे. या मालिकेत त्याने आतापर्यंत राजा, उद्योगपती अशा अनेक भूमिका या साकारल्या आहेत. आता तो या मालिकेत एका अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका साकारणार आहे. सरताज आता या मालिकेत एका खतरनाक गुंडाच्या रूपात दिसणार असून यासाठी त्याचा लूकदेखील वेगळा असणार आहे. सरताजचा या मालिकेतील लूक आता काहीसा द गॉडफादर या चित्रपटातील अल-पचिनो या अभिनेत्यासारखा असणार आहे. याविषयी सरताज सांगतो, "या मालिकेतील राजा या भूमिकेला खूप साऱ्या छटा आहेत. एकाच मालिकेत मला इतक्या भूमिका साकारायला मिळत आहेत याचा मला खूप आनंद होत आहे. या मालिकेत आता मला एका डॉनची भूमिका साकारायला मिळतेय याचा मला आनंद होत आहे. ही भूमिका कथानकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. आता लवकरच मालिकेच्या कथानकाला एक कलाटणी मिळणार असून मी आता या मालिकेत एका डॉनची आणि राणीच्या प्रेमाला मुकलेल्या राजाची भूमिका एकाचवेळी साकारणार आहे. द गॉडफादर हा चित्रपट प्रचंड गाजला होता. हा माझा आवडता चित्रपट आहे. या चित्रपटातील अल पचिनोचा अभिनय मला खूप आवडला होता. या चित्रपटातील डॉनप्रमाणेच मालिकेत माझी रंगभूषा असणार आहे. अल पचिनो यांचा लूक मला या मालिकेत साकारायला मिळत आहे याचा मला आनंद होत आहे. मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये राजा हा मुंबईच्या अंडरवर्ल्डचा अनिभिषिक्त सम्राट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे.