Join us

​या कलाकारांचा होणार एक था राजा एक थी राणी या मालिकेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 17:28 IST

एक था राजा एक थी राणी या मालिकेत आता दोन एंट्री होणार आहेत. इक्बाल खान आणि दीपशिखा नागपाल मालिकेत ...

एक था राजा एक थी राणी या मालिकेत आता दोन एंट्री होणार आहेत. इक्बाल खान आणि दीपशिखा नागपाल मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यांच्या एंट्रीमुळे मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे. राणी म्हणजेच इशा सिंगच्या मतांपेक्षा पूर्णपणे वेगळा मतांचा इक्बाल दाखवला जाणार आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच या दोघांमध्ये खटके उडणार आहेत. राणी आणि राजाच्या जीवनात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न इक्बाल करणार आहे. या मालिकेत काम करण्यासाठी इक्बाल खूपच उत्सुक आहे. एका चांगल्या मालिकेचा भाग व्हायला मिळत असल्याने मी खूपच खूश असल्याचे तो सांगतो. पुढील भागांमध्ये राणी निवडणूक जिंकणार आहे. पण इक्बाल हा पुरुषी वर्चस्व सगळीकडे असायला पाहिजे असे मानणारा आहे. त्याच्या या स्वभावामुळे त्याची आणि राणीची प्रचंड भांडणे होणार आहेत. त्यातच दंगल होणार असून दंगलीत ती राजापासून दुरावली जाणार आहे आणि आसरा घेण्यासाठी इक्बालच्याच घरात राहाणार आहे. आता तो आपल्याला दंगलखोरांच्या हाती देणार असे तिला वाटत असतानाच तो तिचे रक्षणदेखील करणार आहे आणि यावर पुरुषच स्त्रीचे रक्षण करतो असा टोमणादेखील तिला मारणार आहे. राणीला तो पुन्हा राजाकडे जाण्यास मदतही करणार आहे. पण असे असले तरी त्या दोघांमधील तणाव हा कायमच राहाणार आहे. पण त्यानंतर त्याला राणी आवडायला लागणार आहे. यामुळे मालिकेत अनेक नाट्यमय घडामोडी घडणार आहेत.