Join us  

बिग बॉस मराठी 2 : एकेकाळी जेवणासाठीही पैसे नव्हते, बिस्किटच्या पुड्यावर काढायची दिवस बिग बॉसच्या घरातील 'ही' सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 4:41 PM

दोन वेळच्या जेवणापासून ते समुद्रापासून 15 मिनीटांच्या अंतरावर घर घेऊन आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्षमयी आणि प्रेरणादायी प्रवास तिने बिग बॉसमध्ये सगळ्यांना सांगितला.

ठळक मुद्दे संघर्षमयी आणि प्रेरणादायी प्रवास शिवानीने बिग बॉसमध्ये सगळ्यांना सांगितला

बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातली सर्वाधिक स्ट्राँग कंटेस्टंट मानल्या जाणा-या देवयानी फेम अभिनेत्री शिवानी सुर्वेने आपली संघर्षकथा बिगबॉसमध्ये संपूर्ण महाराष्ट्रासमोर पहिल्यांदाच मांडली. दोन वेळच्या जेवणापासून ते समुद्रापासून 15 मिनीटांच्या अंतरावर घर घेऊन आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेला संघर्षमयी आणि प्रेरणादायी प्रवास शिवानीने बिग बॉसमध्ये सगळ्यांना सांगितला.

मुळची चिपळूणची आणि लहानाची मोठी डोंबिवलीला झालेली शिवानी सांगते, “अभिनय क्षेत्रात अपघातानेच आले. आई-वडिलांचे एक्सिबिशन शिवाजीमंदिर नाट्यगृहाच्या शेजारी होते. तिथे मनोहर नरे यांनी ओम नाट्यगंधच्या ‘मांगल्याचे लेणे’ नाटकात मला संधी दिली. ह्या नाटकाच्यावेळी मी डोंबिवलीहून सगळीकडे प्रवास करायचे आणि एकदा एक अख्खी रात्र मला आजीसोबत प्लॅटफॉर्मवर काढावी लागली. त्यामूळे आईने ठरवलं आता मुंबईतच राहायला यायचं. म्हणून आम्ही सायनला राहायला यायचा निर्णय घेतला. पण त्यानंतर आमची आर्थिक स्थिती खूप खालावली.”

ती सांगते, “ एकवेळ अशी आली की, जेव्हा घरात खायचे पैसे नव्हते. कित्येकदा माझ्या लहान बहिणीला पार्ले-जीच्या पुड्यावर अख्खा दिवस काढायची वेळ आलीय. तेव्हा वाण्याकडून सामान आणताना अपू-या पैशाअभावी दहा रूपयाची डाळ, दहा रूपयाचे तांदूळ आणि दहा रूपयाचे तेल आणावे लागायचे. तेवढेच पैसे कसेबसे असायचे. त्यावेळी मी ठरवलं, की घरच्यांसाठी काहितरी करायचं. आणि आज मला अभिमान आहे की, मी वयाच्या 16 वर्षी गाडी घेतली आणि सतराव्या वर्षी आईचे समुद्रापासून 15 मिनीटांवर स्वत:चं घर घ्यायचं स्वप्न पूर्ण केले. “ 

टॅग्स :बिग बॉस मराठीशिवानी सुर्वे