Join us

OMG 'ये रिश्ता क्या कहलाता है' नंतर अक्षरा आता बिग बॉसमध्ये एंट्री करणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 15:33 IST

रसिकांच्या आवडत्या कलाकाराने ती मालिका सोडली की रसिकही त्या मालिकेला पाठफिरवतांना दिसतात.आवडते कलाकार दुस-या मालिकेत गेले की पुन्हा रसिक ...

रसिकांच्या आवडत्या कलाकाराने ती मालिका सोडली की रसिकही त्या मालिकेला पाठफिरवतांना दिसतात.आवडते कलाकार दुस-या मालिकेत गेले की पुन्हा रसिक त्यांच्या आवडत्या कलाकारामुळे नवीन मालिकेकडे वळतात.हीच पब्लिसिटी इनकॅश करण्याचा फंडा काही नविन नाहीय. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून सा-यांची आवडती अक्षराने मालिका सोडली त्यामुळे ती पुन्हा कोणत्या मालिकेत झळकणार? अक्षराने मालिका का सोडली याचे उत्तरही अनुत्तरीच होते.  तिला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहतेही आतुर झालेले आहेत. अक्षराच्या सा-या चाहत्यांसाठी आम्ही देतोय खुशखबर होय, लवकरच ही तुमची लाडकी अक्षरा म्हणजेच हिना खान बिग बॉस 10वा सिझनमध्ये झळकणार आहे. याआधी बिग बॉसमध्ये एंट्री मारण्यासाठी करण मेहरा आणि रोहन मेहराने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिका सोडली होती. त्यातून करण मेहरा नॉमिनेट झाल्यामुळे त्याची बिग बॉसच्या घरातून एक्झिटही झाली. आता फक्त रोहन मेहरा बिग बॉसच्या घरात झळकतोय. करण मेहरा आणि रोहन मेहरा यांनी मालिका सोडल्यानंतर बिग बॉसमध्ये एंट्री मारल्यामुळे तया दोघांच्या पाठोपाठअक्षरा( हिना खान) बिग बॉसमध्ये एंट्री करणार असल्याच्या फक्त चर्चाच रंगत होत्या.त्यामुळे अक्षरा बिग बॉसमध्ये झळकणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षरा बिग बॉसमध्ये एंट्री मारण्यासाठी सज्ज झाल्याचे कळतेय.'बिग बॉस'मध्ये आपल्या आवडते कलाकारांचे कधीही न पाहिलेले पैलु उलगडतात. त्यांचे खाजगी आयुष्याविषयी रसिकांना कळते. कलाकारांच्या संबंधीत अनेक रहस्यांची पोलखोलही बिगबॉसमध्ये होत असल्यामुळे हा शो लोकप्रिय आहे. आणि दुसरे कारण म्हणजे सलमान खान या शोला होस्ट करत असल्यामुळे हा शो अधिक लोकप्रिय आहे.अजब गजब असलेल्या या शोमध्ये आता अक्षरा(हिना खान) सगळ्या गोष्टींचा सामना करताना झलकणार आहे. यापूर्वी मालिकेत साधी सोज्वळ सुन असणारी अक्षराला सा-यांनीच बघितले आहेत.अक्षराने (हिना खान) नैतिक(करण मेहरा)च्या पत्नीची आणि रोहन मेहरा(नक्ष)च्या आईची भूमिका साकारली होती. रोहन(नक्ष) आणि करण(नैतिक) या दोघांची बिग बॉसच्या घरातही चांगली गट्टी जमल्याचे पाहायला मिळाले होते. करण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यामुळे  रोहन एकटा पडला होता त्यामुळे अाता अक्षरा(हिना खान)च्या येण्याने पुन्हा एकदा रोहनला बळ मिळणार आणि बिग बॉसच्या निमित्ताने अक्षराची एक  वेगळी ओळखही रसिकांना होणार हे मात्र नक्की.