Ohh मौनी रॉय बॉयफ्रेंड मोहितसह झाली इंटिमेट सोशलमीडियावर व्हायरल झाले PHOTO?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 12:16 IST
'नागिन' सिझन1 मधून प्रकाशझोतात आलेली टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय सध्या फूल फॉर्मात आहे.नागिनचा पहिला सिझन गाजवल्यानंतर 'नागिन 2' ही ...
Ohh मौनी रॉय बॉयफ्रेंड मोहितसह झाली इंटिमेट सोशलमीडियावर व्हायरल झाले PHOTO?
'नागिन' सिझन1 मधून प्रकाशझोतात आलेली टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय सध्या फूल फॉर्मात आहे.नागिनचा पहिला सिझन गाजवल्यानंतर 'नागिन 2' ही चांगलाच लोकप्रिय ठरतोय.त्यामुळे सतत मौनी रॉयवर कौतुकाचा वर्षावही होतोय. 2016 हे वर्ष मौनी रॉयसाठी खूप खास ठरले.त्यामुळे न्यु इअर सेलिब्रेशनचा मुहूर्त साधत तिने दणक्यात सेलिब्रेशनही केले. नविन वर्षाचे स्वागताचे क्षण खास बनवण्यासाठी बॉयफ्रेंड मोहित रैनासह मौनी गोव्यात चिल करत असल्याचे काही खास फोटो सोशलमीडियावरही शेअर करण्यात आले आहेत. 'देवो के देव महादेव' या पौराणिक मालिकेच्या सेटवर मौनीची मोहितशी मैत्री झाली. या मालिकेत मोहितने भगवान शंकराच्या तर मौनीने सतीची भूमिका साकारली होती.याच मालिकेदरम्यान मोहित आणि मौनीच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.तेव्हा पासून दोघांचे अफेअर सुरू झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. वेळोवेळी दोघांनाही मीडियाने त्यांच्या अफेअरविषयी अनेक प्रश्न विचारले. मात्र यांवर दोघांनी काहीही न बोलणेच पसंत केले. 2016 प्रमाणेच 2017 हे वर्ष दोघांसाठी आणखी खास ठरणार आहे. कारण लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. या दोघांवर आधी त्यांच्या लग्नाविषयी अनेकवेळा वावड्या उठल्या होत्या. मात्र ''यंदा कर्तव्य आहे म्हणत'' हे दोघेही त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागले असल्याची खात्रीलायक माहिती मिळतेय. 'देवो के देव महादेव' पौराणिक मालिकेनंतर मोहितने 'चक्रवर्ती अशोक सम्राट' मालिकेत सम्राट अशोकाची भूमिका केली होती.तर सध्या मौनी रॉय नागिन बनत 'नागिन 2' सिझनमध्ये फन करताना दिसते.