Join us  

नुक्कड फेम समीर खक्कर शोधतायेत काम, पण काम मिळणे झालंय कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 11:57 AM

समीर यांना पुन्हा एकदा पडद्यासमोर झळकायचे आहे. मी काम करण्यास उत्सुक असल्याचे समीर सांगत आहेत. 

ठळक मुद्देसध्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत त्यांना काम मिळत नाहीये. सध्या कोरोना व्हायरसमुळे इंडस्ट्रीची परिस्थिती अतिशय वाईट असल्याने काम मिळणे कठीण आहे याची त्यांना कल्पना आहे.

दूरदर्शनवरील नुक्कड ही मालिका चांगलीच प्रसिद्ध झाली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या होत्या. या मालिकेत खोपडीच्या भूमिकेत समीर खक्कर यांना पाहायला मिळाले होते. समीर यांना पुन्हा एकदा पडद्यासमोर झळकायचे आहे. मी काम करण्यास उत्सुक असल्याचे समीर सांगत आहेत. 

समीर यांनी नुक्कडप्रमाणेच अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. नव्वदीच्या दशकातील तर अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले होते. पण त्यांना सगळ्याच भूमिका सारख्याच मिळत असल्याने त्यांनी कंटाळून १९९६ ला त्यांनी भारत सोडले आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले. तिथे गेल्यानंतर ते अभिनयक्षेत्रापासून दूर झाले आणि तिथे जाऊन  त्यांनी नोकरी केली. पण २००८ मध्ये अमेरिकेत मंदी आल्यानंतर ते भारतात परतले. परत आल्यावर ते कोणाकडे काम मागायला गेले नाहीत. पण तरीही त्यांना चांगल्या भूमिका मिळाल्या. पण सध्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत त्यांना काम मिळत नाहीये. सध्या कोरोना व्हायरसमुळे इंडस्ट्रीची परिस्थिती अतिशय वाईट असल्याने काम मिळणे कठीण आहे याची त्यांना कल्पना आहे.

समीर सांगतात, कोणते चांगलं काम असेल तर ते मला नक्कीच मिळेल अशी मला आशा आहे. मी कॅमेऱ्याच्या समोर जाण्यास उतावीळ आहे. या वर्षांत मला एखादे तरी चांगले काम मिळेल असा मला विश्वास आहे. पण काम मिळावे यासाठी लोकांसमोर हात पसरण्याची मला सवय नाहीये. कोणाकडे माझ्यासाठी चांगली भूमिका असेल तर ते मला नक्कीच विचारतील याची मला खात्री आहे. 

समीर यांनी नुक्कड या मालिकेपासून त्यांच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सर्कस या मालिकेत चिंतामणीची भूमिका साकारली. तसेच श्रीमान श्रीमती, हंसी तो फंसी, संजीवनी या मालिकेत तसेच जय हो, हंसी तो फंसी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजन